बारामती एमआयडीसी हरित व सुंदर करण्यासाठी उद्योजक व प्रशासनाने एकत्रित प्रयत्न करण्याची गरज…धनंजय जामदार

0
181

बारामती एमआयडीसीचे क्षैत्रफळ विस्तीर्ण असलेने येथे व्यापक प्रमाणात वृक्ष लागवड करण्यास वाव असून उद्योजक व एमआयडीसी प्रशासनाने एकत्रित प्रयत्न केल्यास बारामती औद्योगिक क्षेत्र हरित व सुंदर होण्यास वेळ लागणार नाही असे मत बारामती इंडस्ट्रियल मॅन्यूफक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी व्यक्त केले. पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून एमआयडीसी बारामती विभाग व बारामती इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी धनंजय जामदार बोलत होते.

एमआयडीसीचे उपभियांत विजय पेटकर, एमआयडीसी अग्निशमन केंद्र प्रमुख सुनील इंगवले, अभियंता आरएस भोसले, बारामती इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशनचे सचिव अनंत अवचट, सदस्य मनोज पोतेकर, महादेव गायकवाड, मनोहर गावडे, अंबिरशाह शेख वकील, कॉटन किंग कंपनीचे प्रकल्प प्रमुख खंडोजी गायकवाड, उद्योजक दत्तात्रय वाबळे, नितीन नलवडे, रावसाहेब पाटील, विकास ननवरे, शिवराज जामदार, पंडित रणदिवे, गोकुळ हरपळे आदी उद्योजक मोठ्या संखेने उपस्थित होते.

एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा तसेच मोकळ्या जागेत जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा महामंडळाचा प्रयत्न असल्याचे उपभियांत विजय पेटकर यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here