२६ नोव्हेंबर रोजी बारामती पॉवर मॅरेथॉनचे आयोजन : नावनोंदणी शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न
ता.१ (प्रतिनिधी) : बारामती पॉवर मॅरेथॉनचे या फुल्ल मॅरेथॉनचे आयोजन दि.२६ नोव्हेंबर २०२३ रोजी बारामती येथे केले जाणार आहे.बारामती स्थित क्रीडा क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या , बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशन द्वारे या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन केले जाणार आहे.
४२ किमी , २१ किमी , १० किमी आणि फन रन – ५ किमी अश्या कॅटेगरी मध्ये ही स्पर्धा होणार असून , वर्ल्ड अथलिट्स असोसिएशनच्या मान्यतेने ही मॅरेथॉन आयोजित केली जाणार आहे. या मॅरेथॉन साठी नावनोंदणीचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते आज वैष्णवी ग्राफिक्स , बारामती येथे संपन्न झाला.
बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वीय सहाय्यक हनुमंत पाटील , बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव , कारभारी अण्णा चॅरिटेबल फाऊंडेशनचे सचिव प्रशांत नाना सातव यांच्या उपस्थितीत नावनोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी १० किमी मॅरेथॉनसाठी स्वतःचे नाव नोंदवून स्वतः या मोहिमेस प्रारंभ केला.
बारामती पॉवर मॅरेथॉन सर्व स्तरातून यशस्वी होण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पूर्ण सहकार्य मिळेल अशी ग्वाही सर्वच मान्यवरांनी याप्रसंगी दिली.
सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जगताप यांनी केले. तर , आभार सतिश ननवरे यांनी मानले.
याप्रसंगी , सचिन पवार , मच्छिंद्र आटोळे , जावेद सय्यद , मंगेश ओमासे , प्रसाद चव्हाण , मयूर सालपे आदी मान्यवर उपस्थित होते.