१९ आणि २० पासून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा प्रारंभ श्री क्षेत्र कण्हेरी येथून….

0
92

दि.१९ आणि २० पासून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा प्रारंभ श्री क्षेत्र कण्हेरी येथून….

महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या ननंद विरुद्ध भावजयी बारामती निवडणूकीच्या प्रचाराचा प्रारंभ कण्हेरीतून होणार….!

महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा प्रारंभ श्री क्षेत्र कण्हेरी येथून केला जाणार आहे.

बारामती -निवडणूक 2024 महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा प्रारंभ श्री क्षेत्र कण्हेरी येथून केला जाणार आहे.

सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा प्रारंभ शुक्रवारी १९ रोजी सकाळी

आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा प्रारंभ शनिवारी २० रोजी सकाळी १०वा. होणार तर

शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सुप्रिया सुळे यांचा तर अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनेत्रा पवार यांचा प्रचाराचा नारळ कण्हेरीच्या मारुतरायाला वाढविला जाणार आहे.

बारामतीत सर्वच निवडणुका पवार कुटुंबियांकडून लढलेल्या विधानसभा व लोकसभा निवडणूकीचा प्रारंभ कण्हेरीतून झालेला आहे. यावेळी दोन्ही बाजूंकडून प्रचाराला प्रारंभ होणार आहे. कन्हेरीच्या मारोतरायापासून तर कण्हेरीचा मारुतराया कोणाला पावणारअशी बारामती मतदारसंघात चर्चा होत आहे.

यावेळची निवडणूक देशातील सर्वाधिक लक्षवेधी महाराष्ट्रातील सर्व लढतींपैकी वेगळी समजली असून केवळ राज्याचेच नव्हे तर देशाचेही लक्ष या निवडणूकीकडे लागून राहिले आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या वतीने कॉर्नर सभा, घोंगडी बैठका, पदयात्रा, घरोघरी भेटीगाठी, मेळावे, भोजने या माध्यमातून दोन्हीकडून प्रचाराचा धूम धडाका सुरू झालेला आहे. समाजमाध्यमांवरुनही वेगाने प्रचार सुरु आहे. भाजप काँग्रेस शिवसेना…. दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ कोणत्या स्टार प्रचारकांच्या सभा बारामती मतदारसंघात होणार या कडे आता सर्वांचेच लक्ष आहे. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या तसेच राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या सभा या मतदारसंघात होणार का या कडे सर्वांचेच लक्ष आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बारामती निवडणूक 2024 प्रतिष्ठेची राहणार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here