हुतात्मा दिनाची राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली मोठ्या प्रमाणात संपन्न …!
बारामती:- हुतात्मा दिनाच्या आठवणी उजळ करण्यासाठी बारामतीतील सर्व नागरिकांनी वार मंगळवार दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी सकाळी ठीक १०.५९ वाजता हुतात्मा स्तंभ,वंदे मातरम चौक बारामती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहून राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना आदरांजली वाहण्यात आली.
हुतात्मा दिन हा दरवर्षी संपूर्ण भारत देशात भारत सरकार तर्फे केला जातो तसेच बारामती येथे सुद्धा बारामती तालुका स्वातंत्र सैनिक संघटना बारामती व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना बारामती हुतात्मा दिन करत असतात.
तसेच स्वतंत्र सैनिक पत्नी श्रीमती लीलावती तावरे, श्रीमती जयश्री किर्वे, माननीय तहसीलदार साहेब, माननीय मुख्याधिकारी साहेब, माननीय बारामती शहर पोलीस निरीक्षक साहेब, माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी साहेब, बारामती सहकारी बँकेचे संचालक वकील श्री शिरीष कुलकर्णी, प्रशांत नाना सातव कारभारी अण्णा चारीटेबल फाउंडेशन इंग्लिश मीडियम शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी वंदे मातरम गीत म्हटले विरोधी पक्षनेते सुनील सस्ते, प्राध्यापक रमेश मोरे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष जय पाटील, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संभाजी नाना होळकर, काँग्रेस आय कार्यकर्ते, माजी नगराध्यक्ष सौ.संध्याताई बोबडे, नवनाथ बल्लाळ,निरेश मोरे, संतोष जगताप,पार्थ गालिंदे,राष्ट्रवादी शहर युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे,राष्ट्रवादी शहर महिलाअध्यक्ष सौ.वनिताताई बनकर,वकील करीमभाई बागवान, वकील आशिष खुंटे , वकील रमेश कोकरे , वकील मुकुंद बडवे, वकील श्याम पोटरे ,
तरी या कार्यक्रमास बारामतीतील सर्व नागरिकांनी युवा विद्यार्थी- विद्यार्थिनी, व्यापारी,डॉक्टर, वकील, सर्व संस्थेचे पदाधिकारी,सर्व शाळा , महाविद्यालय , मुख्याध्यापक , शिक्षक , पदाधिकारी , सर्व संस्थेचे पदाधिकारी , सरकारी निमसरकारी अधिकारी, बारामती नगर परिषदेचे आजी-माजी नगरसेवक, कर्मचारी , सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते , यांनी हुतात्मा दिन आदरांजलीकरिता बारामती येथील हुतात्मा स्तंभ, वंदे मातरम चौक, येथे वार मंगळवार दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी सकाळी ठीक १०.५९ वाजता नविसरता राष्टीय पोशाखात हजर होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बारामती तालुका स्वतंत्र सैनिक संघटना बारामती व बारामती तालुका स्वतंत्र सैनिक उत्तराधिकारी संघटना यांचे संभासद व कुटुंबीय मोहन रणदिवे, दिलीप तांबे ,सौ.वर्षा किर्वे, पोपट गादिया, शामराव जगताप, यतीन कोठारी, नाभीराज कोठारी, विश्वास नागवडे ,श्रीराम देशमुख, पवन घोरपडे , कबीरभाई तांबोळी, अक्षय मुळीक, सुरज मुळीक , मोहन मोरे, रमेश रणदिवे , सुरेश समर्थ, महावीर शहा,इत्यादी तसेच बारामती नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी, तहसीलदार व प्रांत कार्यालय अधिकारी , कर्मचारी व पोलीस दल , यासर्वाचे बहुमोल सहकार्य मिळाले व केले.
हुतात्मा दिनाची राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली मोठ्या प्रमाणात संपन्न …!
हुतात्मा दिनाची राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली मोठ्या प्रमाणात संपन्न ...!