हिंदवी स्वराज्य महोत्सव अंतर्गत भव्य ‘महाशिव आरती’ संपन्न

0
182

हिंदवी स्वराज्य महोत्सव अंतर्गत भव्य ‘महाशिव आरती’ संपन्न

जुन्नरच्या पर्यटन विकासासाठी पुढील दोन वर्षात १०० कोटी-राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा

पुणे, दि.१९: जुन्नरच्या पर्यटन विकासासाठी पुढील दोन वर्षात १०० कोटी उपलब्ध करून देण्यात येतील; तसेच यावर्षीच्या हिंदवी स्वराज्य महोत्सवासारखे आयोजन यापुढे शिवजयंतीनिमित्त दरवर्षी करण्यात येईल, असे राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले.

शिवजयंतीनिमित्त राज्य शासनाकडून आयोजित हिंदवी स्वराज्य महोत्सव अंतर्गत भव्य महाशिव आरतीचे जुन्नर येथे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार प्रवीण दरेकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा नियोजन समिती सदस्य आशा बुचके आदी उपस्थित होते.

श्री. लोढा म्हणाले, यावर्षी शिवजयंतीला उत्साहाचे वातावरण आहे. जुन्नरच्या पर्यटन विकासासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी शिवकालीन गाव उभे करण्यात येईल. पर्यटन विभागाकडून येथे कायमस्वरूपी टेन्ट सिटी उभी करु, असेही ते म्हणाले.

यावेळी हातात दिवे, पणती घेऊन शिवनेरी किल्ल्याच्या दिशेने महाशिव आरती, शिव वंदना करण्यात आली. त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

यावेळी आमदार श्री. दरेकर, ह.भ.प. पंकज महाराज गावडे, ह.भ.प. राणा महाराज वासकर यांनी मनोगत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here