हाजी हैदरभाई सय्यद यांचे निधन
बारामती – मुस्लीम समाजातील ज्येष्ठ नागरिक हाजी हैदरभाई इस्माईलभाई सय्यद (वय 85) यांचे शुक्रवार (दि. 11) रोजी अल्पशः आजाराने निधन झाले. ते मुस्लीम बँकेचे संचालक आलताफ सय्यद यांचे वडील व माजी उपनगराध्यक्षा सौ. तरन्नुम आलताफ सय्यद यांचे सासरे होते.
हैदरभाई यांनी सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग घेतला होता. समाजातील अनेक गरजूंना मदतीचा हात देत ते कायम पुढे राहत. विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण होता.
त्यांच्या शांत, संयमी आणि मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वत्र परिचित होते. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. अंत्ययात्रेत सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
साप्ताहिक भावनगरी शिंदे परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

