‘हर-घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे बारामती नप चे नागरिकांना आवाहन

0
68

‘हर-घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे बारामती नप चे नागरिकांना आवाहन

बारामती, दि. १२: नगरपरिषदेच्यावतीने शहरात १५ ऑगस्टपर्यंत ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) अभियान राबविण्यात येत असून यामध्ये समाजातील सर्व घटकातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांनी देशाप्रती दिलेल्या योगदानाचा संदेश घरोघरी पोचविण्यासाठी नगर परिषदेच्यावतीने हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. यादृष्टीने क्रांती दिनापासूनच ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

यावेळी नगर परिषदेतर्फे नागरिक, स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी तिरंगा प्रतिज्ञा घेतली व ‘घरोघरी तिरंगा’ अभियानातही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन
‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत शाळा, महाविद्यालयात  तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम- देशभक्तीपर गीत गायन व नृत्य कार्यक्रम, तिरंगा कॅनवास तयार करणे, तिरंगा प्रतिज्ञा ,तिरंगा सेल्फीज घेणे आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. शहरात विविध ठिकाणी तिरंगा सायकल रॅली, तिरंगा

मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येणार येणार आहे. नागरिकांमध्ये तिरंगा ध्वजाची जनजागृती करणे, देशभक्तीची भावना जागृत करून घरोघरी, गच्चीवर, कार्यालय, शाळा, महाविद्यालयावर तिरंगा फडकवावा, असे बारामती नगरपालिकेच्या वतीने आवाहन केले आहे.
0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here