स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्ती निमित्त “वसुधा वंदन” अंतर्गत देशी प्रजातीच्या ७५ रोपट्यांची लागवड…

0
224

स्वातंत्र्याच्या ७५ वर्ष पूर्ती निमित्त “वसुधा वंदन” अंतर्गत देशी प्रजातीच्या ७५ रोपट्यांची लागवड…

बारामती प्रतिनिधी:
मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत आयोजित बारामती नगर परिषद अमृतवाटिका बारामती आज दिनांक १२ ऑगस्ट रोजी उत्कर्ष सोसायटी लागून सूर्यनगरी येथे स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षपूर्ती निमित्ताने “वसुधा वंदन’ अंतर्गत देशी प्रजातीच्या ७५ रोपवाटिकेची लागवड बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली .


माझी माती माझा देश अभियानांतर्गत बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा 9 ऑगस्ट पासून सुरू झालेला आहे .

या सांगता सोहळ्यानिमित्त राज्यात “मिट्टी को नमन, वीरो को वंदन” या घोषवाक्यसह देशात आयोजित कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत.
या निमित्ताने आज बारामतीत सूर्यनगरी येथील भागात “अमृत वाटिका” हा उपक्रम च्या माध्यमातून ७५ वृक्षांची लागवड करण्यात आली.

यावेळी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे ,
बारामती नगर परिषदेचे गटनेते सचिनशेठ सातव, पंचायत समितीचे गटनेते दीपक मलगुंडे,नगरसेवक अतुल बालगुडे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण भैय्या माने, एन्व्हायरमेंटल फोरमचे सुदाम कडणे सर , भावनगरी संपादक संतोष शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी, मान्यवर नगर परिषदेचे कर्मचारीवृंद यांच्या उपस्थितीत ७५ वृक्ष लागवडीचा कार्यक्रम “मेरी माटी मेरा देश” या अभियानांतर्गत बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here