सुगम्य जनजागृती यात्रेचे उद्घाटन दिव्यांग कल्याण आयुक्त : प्रवीण पुरी यांच्या हस्ते संपन्न.

छायाचित्र : सुगम्य जनजागृती यात्रेचे उद्घाटन करतांना मान्यवर.
पुणे (दि.७) सुगम्य भरत योजनेअंतर्गत केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्तींचा सार्वजनिक ठिकाणी अडथळा विरहित सुलभ वावर होण्याच्या दृष्टीने दिनांक ७ ते ९ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान सुगम्य जनजागृती यात्रा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी यांच्या शुभहस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिशन देवढे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता मंजिरी देशपांडे, दिव्यांग प्रतिनिधी धर्मेद्र सातव, दामोदर सरगम आदी मान्यवर उपस्थिती होते. सदर सुगम्य जनजागृती कार्यक्रमाचा उद्देश सर्वसामान्य नागरिकांमध्ये दिव्यांग व्यक्तींच्या गरजा व सुगम्यते बाबत जनजागृती करणे तसेच घटनात्मक व कायदेशीर हक्क आणि दायित्वा बद्दल जागरुकता निर्माण करणे असा आहे. या मध्ये दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, बंडगार्डन पोलीस ठाणे पुणे, सारसबाग गणपती पुणे, के.के.मार्केट पुणे, रांजणगाव गणपती, भीमाशंकर देवस्थान, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विक्टरी सिनेमागृह कॅम्प, व क्लोवर मार्केट कॅम्प या ठिकाणांचा समावेश असून जिल्हा परिषद पुणे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, व दिव्यांग व्यक्ती या तज्ञ व्यक्तींचे गट सदर ठिकाणांची अडथळा विरहित करण्याकरिता पाहणी करून केंद्रास अहवाल सादर करणार आहेत.