वंदनिय साहित्य रत्न आण्णा भाऊ साठे यांचे अनुयायांनो,
आण्णा भाऊंचे जिवन!जगण्याची शिकवण!
एक ऑगष्ट आण्णा भाऊंच्या जयंतीच्या दिनी त्यांना विनम्र अभिवादन करताना,त्यांचे जिवनाचा आदर्श घ्यावाच लागेल.
एक ऑगष्ट एकोणीसशे वीस ते
अठरा जुलै एकोणीसशे एकुनसत्तर या अवघ्या पन्नाशीचा जिवनकाळ देखील लाभला नसताना युगे युगे राहील अशी अजरामर किर्ती करुन ते जगले.
आम्ही लिहितो,सांगतो आण्णा भाऊ दिड दिवस शाळेत गेले.हि त्यांची शैक्षणिक परिस्थिती होती.तरी देखील त्यांचे साहित्य आज विद्यापीठाच्या पाठ्य पुस्तकात आहे.अनेक भाषेत त्यांची भाषांतरे झाली.अनेक विद्वानांनी त्यावर विद्यावाचस्पती हि पदवी घेतली हे का,घडले यावर आम्ही समिक्षा करीत नाही.
समिक्षण केले तर एकच आदर्श आम्हाला घेता येईल परिस्थिती बदलता येत नसली तरी मानसिकता बदलली तर जिवन सार्थकी लागु शकते.आण्णा भाऊ कधी हि आपल्या दारिद्र्याला, अशिक्षितपणाला कवटाळून बसले नाही.मनात कधी न्युनगंड ठेवुन जगले नाही.तर आपल्या स्वतःभोवती असणारा बंदिस्त कोश कुरतडुन सुरवंट जग पाहतो.आपल्या भोवती असणारा कोश कुरतडुन बाहेर पडुन जग पाहायला ते शिकले आम्ही हि शिकले पाहीजे.
जग पाहायला आण्णा भाऊ शिकले.चार भिंतींच्या शाळेत त्यांना शिकता आले नाही हि खंत हे दारिद्र झटकुन टाकण्यासाठी त्यांनी पेपरच्या तुकड्यावरील मजकुरातील अक्षर जुळवुन, दुकानाच्या पाट्यावरील अक्षरे जुळवुन ज्ञान आत्मसात करण्यासाठी अक्षर ओळख करुन घेण्यासाठी दशदिशा असणाऱ्या जगाच्या शाळेत ते शालेय शिक्षणात असणाऱ्या जातीच्या भिंती पाडुन ते शिकले. जातीयतेच्या भिंती पाडून हि ताठ मानेने जगता येते हे त्यांनी दाखवुन दिले.आण्णा भाऊचे जिवन आम्ही जाणुन घेतले तरच त्यांच्या साहित्याला असणाऱ्या सागराची खोली व आकाशाची उंची आम्हाला जाणुन घेता येईल.
१ ऑगस्ट १९२० ते १८ जुलै १९६९ हा त्यांच्या जिवनाचा कालखंड पाहिला तर त्यांचे शरिर हे जैविक असले तरी मेंदु हा निसर्गाने बहाल केलेल्या अद्भुत शक्तीची देणं असेच म्हणावे लागेल.त्यांचा बुध्दांक काढायला साहित्य विश्वाची मोजपट्टीत मध्यंतरी न थांबता अति उच्च बिंदु वरच ती लावावी लागेल असे धाडसाने अभिमानाने मांडता येईल
जिवनाच्या या ४८ वर्ष ११ महिने १७ दिवसाच्या कालखंडात मानवी काया जगविण्यासाठी लागणारा वेळ त्यात बालपण आले.वाटेगाव ते मुंबई पायी प्रवासाचा काळ आहे.दैनंदिन जिवन क्रम आला.निद्रा आली. पोटाची खळगी भरण्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट,सामाजिक प्रबोधनासाठी हाती डफ घेऊन गायलेली गगनभेदी शाहिरी त्यासाठी झालेली दमछाक, रशियाचा विदेश दौरा याच्या काळ,काम वेगाचे गणित मांडले व त्यावरुन आण्णा भाऊच्या साहित्यातील प्रत्येक शब्दाचा विचार केला तर कुबेराच्या संपत्तीला हि लाजविल इतकी अक्षरसंपदा आण्णा भाऊची होती.हि संपदा पाहुन आण्णा भाऊ हे साहित्य जगताच्या अथांग सागरात असणाऱ्या शिंपल्यातले निसर्गदत्त असे अनमोल मोतीच होते.
अण्णा भाऊच्या अंगी नेतृत्व गुण होते.परंतु त्यांनी नेतृत्व गुणा पेक्षा हि कतृत्व शाहिरी तुन निर्माण होणारे वकृत्व हे जाणुन घेतले.हे आम्ही जाणले पाहीजे.आण्णा भाऊंनी ढोलकी तुणतुण्याच्या तमाशा कलेला लोककला हा दर्जी मिळवुन दिला.रशियाच्या मातीतल्या महान लेखक मॅक्झिम गौर्की या महान लेखका इतकाच बहुमान रशियाने आण्णा भाऊंना दिला तर आण्णा भाऊंनी भारतभुमीचे सुपुत्र छत्रपती शिवरायांचा पोवाडा रशियात गाऊन देशाची महानता व शिवरायांचे आठवावे रुप आठवावा प्रताप हे रशियात दाखवुन दिले.
आण्णा भाऊ मुंबईत राहिले शहराचा बकालपणा त्यात जगणारी व जगण्यासाठी संघर्ष करणारे सामाजिक उतरंडीत असणारे नायक उभे करुन समाजवाद,साम्यवाद निर्माण व्हावा हि जाणिव प्रस्थापिताना करुन दिली.शहरात राहुन देखील त्यांनी गावाकडची नाळ कधी तोडली नाही.किंवा साठे हे सरळ लिहित राहिले.साठ्ये असे अनुनासिकात शब्द उच्चारुन जात चोरुन ते कधी राहीले नाही.तर दारिद्र्याच्या दलदलित हि ते जगले नाही.तर त्यावर एका ओळीत भाष्य केले गुलामगिरीच्या चिखलात का, रुतुन बसला ऐरावत हि चित्र उभे करुन त्यांनी अस्सल ग्रामीण जिवनाच्या संघर्षाच्या समाज व्यवस्थेच्या कथा लिहुन ग्रामीण जिवनाच्या व्यथा लिहल्या.
आण्णा भाऊचा जिवनपट पाहिला तर ते स्वतःसाठी जगलेच नाही तर प्रबोधनातुन समाज जगविण्यासाठीच जगले.केवळ समाजच नाही तर हे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्म, कर्मभूमी असलेले राज्य
महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणुन ते लढले.त्यांच्या लढ्यात कामगार लढा होता.पुंजीपती धनदांडग्या मालक शाही व प्रस्थापिताची समाज व्यवस्था मोडुन काढणारे लढे ते लढले.
त्यांची लेखणी जितकी धारदार होती.तितकेच धारदार दांडपट्टा तलवारबाजी लाठीकाठी चालविण्यात ते पारंगत होते ते बाळकडु त्यांना माता वालु आईने फकिराने ब्रिटिश सत्तेच्या लुटलेल्या मोहोराच्या वाचण्यासारखा या पाजले होते.आण्णा भाऊच्या साहित्यातील एक एक शब्द उपमा अलंकार काव्यात्मक ओळी जशा वाचण्यासारख्या आहेत. तसेच त्यांचे जिवन आहे.
कधी तळपती तलवार तर कधी जिवनाला सुगंध देणाऱ्या पुष्पा प्रमाणे एका चित्रपटातील गीत प्रमाणे आहे.
झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा फुलला पहा सभोती आनंद जीवनाचा
झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा
होईल ताप काही
मध्यान्हीच्या उन्हाचा
अविचार सोड असला कोल्हाळ कल्पनांचा
पुष्पास वाटते का
भय ऊन पावसाचे
आयुष्य त्यास आहे एकाच दिसायचे
हसुनी करी परि ते वर्षाव सौरभचा
झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा असे वंदनीय साहित्य रत्न
आण्णा भाऊचे जिवन शरीराने राकट कणखर दगडाच्या महाराष्ट्र देशा सारखे तर जगणारे जिवन हे वरील काव्य पंक्ती प्रमाणे.त्यांच्या या समर्पित जिवनाला मी वाहिलेले हे शब्द पुष्प
आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता