सावित्री ज्योतिबा ना डोक्यावर घेऊ…
चला बिगी बिगी बारामती ला जाऊं
सावित्री ज्योतिबा ना
डोक्यावर घेऊ…
झटकून मरगळ
होऊ द्या धावपळ
प्रवाहात सामील होऊ..
चला बिगी बिगी बारामतीला जाऊं

सावित्री ज्योतिबा ना
डोक्यावर घेऊ…
नुसतं डोक्यावर नको
मेंदूत घूसवून विचार
त्यांना काळजात ठेऊ..
तु मोठा कि मी मोठा
नकोत असल्या भंपक स्पर्धा…
समतेसाठी चल ऊठ मर्दा….
आपण सारे भाऊ भाऊ..
चला बिगी बिगी बारामतीला जाऊं
सावित्री ज्योतिबा ना डोक्यावर घेऊ…
असेल कोणी तालेवार
असेल कोणी फाटका
सगळ्यांना सांभाळून हातात हात घालून..
गाणे समतेचं गाऊ…
चला बिगी बिगी बारामतीला जाऊं.. सावित्री ज्योतिबा ना डोक्यावर घेऊ..
नितीन कुमार शेंडे
मळद बारामती

