सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा….

0
33

महाराष्ट्रातील तमाम बांधवांना दिपावली पर्वातील या सर्व दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
वसु बारस , धन त्रयोदशी नरक चतुर्दशी, लक्ष्मी पुजन भाऊबीज
या पर्वातील आपला कार्यकाल आनंदमय जावो दिव्याच्या मंगलमय प्रकाशात आपली वास्तु आपला परिसर आपला तालुका आपला जिल्हा आपले राज्य उजळत राहो याच शुभेच्छा आपण सर्व एकदुज्याला देवो एकतेत खरी ताकत असते

आपले राष्ट्र सतत उजळत ठेवण्याचे आपले हातात आहे. दिनांक २० नोव्हेबर २०२४ रोजी आपणच ठरवायचं की,हाच दिपावलीचा आनंद वर्षानुवर्षे व्दिगुणित ठेवायचा की, राजकर्त्याची गुलागिरी स्विकारुन या राज्यात शिमगा,धुळवड, सारखी बोंब मारण्याची परिस्थिती निर्माण करुन या राज्याला द्रारिद्रयाच्या खाईत लोटायचे की,भ्रष्टाचारावर माती लोटुन राज्य सुजलाम सुफलाम करायचे आहे.

हे राज्यकर्ते देशातले लबाड कोल्हे,रंग बदलणारे सरडे, खोडारडे आहेत. चिमुटभर गवगवा करुन देतात व मुठभर काढुन घेतात. आज तुमच्या दारात लोटांगण घालतील उद्या त्यांच्याच दारातुन लोटुन लावतील.

बांधतात रस्ते रस्त्यावर ठायी ठायी टोलधाडी आहेत. दिवसा ढवळ्या लुटतात रस्त्यावर खड्डे हेच तर खरे लुटारुचे अड्डे!हे ते लावतात दिवे तुम्ही लावा छोटीशी पणती पण,ती क्रांतीची असली पाहीजे.दिपावलीत लावतो. ती पणती पहा अमावस्येचा अंधारात देखील प्रकाशमान होऊन अंधाराला चिरुन आसमंत प्रकाशमान करते. अशा असंख्य पणत्या लावुन महाराष्ट्रा हि भष्टाचाराची अमावस्येचा अंधार आहे तो मतपेटीतुन दुर सारा प्रकाशमान निश्चितच होईल.

शासनात नाही जाणते! म्हणुन प्रशासनाचे फावते! नेते आहेत नेणते! तुम्ही तरी व्हा जाणते!
एकेकाळचे महा-राष्ट्र आज होत आहे निकृष्ट ! या राष्ट्राला लुटु लागले प्रशासनातील कलम कसाई, नेता,अभिनेता लाल दलाल सारेच मालामाल असे लुटारु दुष्ट!

आता जागे व्हा. लोकशाहीचे नावावर आली घराणेशाही ठोकशाही देशाच्या लुटल्या जात आहेत दिशा दाही! तुम्ही आम्ही मात्र गोंजारीत बसलो आमची महाराष्ट्र माही व,आमची महाराष्ट्र माही!
आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here