सरकार मायबाप.. चिपळूण तालुक्यातील नाभिक समाजातील त्या पीडित मुलीला न्याय मिळावा…!
बारामती (भावनगरी) प्रतिनिधी:
बारामती तालुका नाभिक संघटनेच्या वतीने चिपळूण तालुक्यातील नाभिक समाजातील संशयास्पद नीलिमा चव्हाण मृत्यूप्रकरणी आज बारामती शहर पोलीस स्टेशनला निवेदन सादर…
चिपळूण तालुक्यातील ओमळी गावची कु. नीलिमा चव्हाण हिच्या बेपत्ता होणे व संशयास्पद मृत्यूप्रकरणी कसून चौकशी होऊन नीलिमा चव्हाण हिच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा करिता.
आज दिनांक 10 रोजी बारामती तालुका नाभिक संघटनेच्या वतीने बारामती तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर माने, सुरेश साळुंखे, किरण किर्वे, किसन भाग्यवंत, हेमंत जाधव ,अनिल दळवी, आकाश काळे, गणेश काळे, आदेश आ पुणे, सुरेश गायकवाड, यांनी सदर बारामती शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले आहे की,
कु. निलिमा सुधाकर चव्हाण राहणार मुळगाव ओमळी, तालुका चिपळूण येथे येण्यास निघाली व ती तेथून बेपत्ता झाली त्यानंतर दिनांक ०१/०८ २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजता दाभोळ खाडी येथे तिचा मृतदेह मिळाला यादरम्यान खालील नमूद केलेल्या घटना किंवा नोंदी या त्या मुलीचा बाबतीत घडल्याच्या आमचे सर्व समाज बांधवांचे खात्री आहे.
त्यामध्ये १) सदर मुलगी कुमारी नीलिमा सुधाकर चव्हाण ही उच्चशिक्षित संस्कारी मुलगी होती ती कोणत्याही वाईट चालीची नव्हती २) सदर दिवशी ती दापोलीहून खेड येथे एसटी स्टॅन्ड ला गेल्याचे सीसीटीव्ही दिसत आहे त्याबरोबर खेड मध्ये एका मुलीबरोबर चिपळूण ला जाण्याच्या गाडीत बसल्याचेही सीसीटीव्ही दिसत आहे त्यानंतर ते बेपत्ता झाली ३) मात्र पोलीस यंत्रणेचा तपासात मोबाईल लोकेशन २९/ ६/ २०२३ रोजी ठीक बारा वाजून पाच मिनिटाला रात्री रेल्वे स्टेशन अंजनी येथे दाखवत होते त्यानंतर मात्र बंद दाखवत होते ते संशयास्पद आहे ४) त्या मुलीचा मृतदेह ज्या स्थितीत मिळाला त्यामध्ये पाण्यात मृतदेह राहिला तर एवढ्या प्रकारे मृतदेहाची छेडछाड केली डोक्यावरचे एक पूर्ण केस नष्ट होणे डोळ्यावरील भुवया नष्ट होणे हे सर्व मृतदेहाची ओळख पटू नये या दृष्टीने छेडछाड आहे हे आमचे ठाम मत आहे ५) त्या मुलीवर कोणत्यातरी अज्ञात इसमाने आठदहा जणांच्या समूह्यने तिच्यावर अतिप्रसंग करून त्यानंतर तिची ही स्थिती करून तो मृतदेह पाण्यात फेकला असावा असे संशयास्पद आहे त्या दृष्टीने तेथील वरिष्ठ यंत्रणेने कसून तपास होणे आवश्यक आहे.
तरी आमच्या नाभिक समाजातील भगिनीला न्याय मिळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. त्या दृष्टीने १२ ऑगस्टपर्यंत तपास करून ते योग्य कारवाई करू असे चिपळूण येथील डीवायएसपी साहेबांनी आमच्या नाभिक समाजाचे पुणे येथील समाजातील निवेदन घेऊन गेलेल्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे.
तरी १२ ऑगस्टपर्यंत श्री सुधाकर चव्हाण कुटुंबियांना न्याय मिळावा. संपूर्ण नाभिक समाज सुधाकर चव्हाण यांच्या कुटुंबाच्या सोबत आहे. चव्हाण कुटुंबीयांना न्याय न मिळाल्यास राज्यभर समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी राज्य शासनाची राहील. असेही बारामती शहर पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे..!