सरकारी कागदपत्रावर वडिलांसोबत आईचेही नाव लिहिण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता; आज १ मे २०२४ पासून बजावणी,,,,! ३० : प्रतिनीधी: प्रत्येक सरकारी कागदपत्रावर वडिलांसोबत आईचेही नाव लिहिण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्र दिनापासून (१ मे) होत आहे. राज्य सरकारच्या धोरणानुसार यापुढे सर्व अधिकृत सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव लिहिणे बंधनकारक आहे. यात जन्म प्रमाणपत्र, शाळेचा दाखला, मालमत्तेचे उतारे, आधारकार्ड व पॅनकार्ड आदी विविध सरकारी आवश्यक कागदपत्रांचा समावेश आहे. आतापर्यंत यावर मुलाच्या नावापुढे आईचे नाव नव्हते. केवळ वडिलांचे नाव होते. आईचे नाव लिहिणे ऐच्छिक होते. कागदपत्रांवर आईचेही नाव लिहावे लागणार आहे. विशेष म्हणजे वडिलांच्या नावापूर्वी आईचे नाव असणार आहे. आता एक मे पासून जन्मणाऱ्या सर्व बालकांच्या नावाची नोंद करताना वडिलांच्या नावाआधी आईचे नाव लिहिणे बंधनकारक आहे. नाव लिहिताना सुरवातीला आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव व शेवटी आडनाव लिहावे लागणार आहे. जन्म-मृत्यू दाखल्यासह शैक्षणिक परीक्षा, महसूल, पगार पत्रक अशा विविध आठ कागदपत्रांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. मुलामुलींच्या विवाह नोंदणी प्रमाणपत्रावरही आईचे नाव येणार आहे. आधी केवळ वडिलांचे नाव असायचे. मात्र, आता त्यावर वधू वरांचे आई- वडील अशा दोघांची नावे आता एक मेपासून या सर्व लिहावी लागणार आहेत.