छत्रपतीच्या जयंती दिनी करुन अभिवादन करु स्मरण!चरणी करु विनवणी घ्या जन्म पुन्हा करण्या भुमीचे तारण!*
राहिली नाही लोकशाही आजचे बरबटलेले राजकारण!
भ्रष्टाचाराने पोखरले देशाचे अर्थकारण!
जातीपातीत धर्मात गुरफटले समाजकारण!
झाला शिक्षणाचा खेळखंडोबा चोहिकडे बाजारीकरण!
बंद शासकीय रोजगार सुरु ठेकेदारी अन जागतीकरण!
याला भ्रष्ट नितीने मतदान करतात मतदार हे एकच कारण!
नाही हमी भाव उघड्या डोळ्याने पाहतो शेतकरी आपले मरण!
तरुणाईला नाही रोजगार,होईना त्याचे तारण!
नेत्यांचा जयजयकार करीत फिरते तरुणाई विनाकारण !
हवी असेल लोकशाही तर परिवर्तनाच्या एल्गाराचे करा जनजागरण!
नका मरु उपाशी पोटी असा नेता निवडा जो करील उदरभरण!
अबलेला सबला म्हणून जगता येईल होणार नाही महिलेच हरण!
नेत्याना असा धडा शिकवा झाले पाहिजे त्यांच्या ठोकशाहीचे गर्वहरण!
डोळ्यासमोर ठेवा आता जनहिताचे नाना उदाहरण!
पाणी हेच जीवन साठविण्या पाणी बांधा बंधारे अन् धरण!
विजचा वापर योग्य करा त्यावर निर्भर आहे औद्योगिकीकरण !
सरळ रस्त्याने चालण्या खड्डे बुजवा अपघातात होते निष्पापाचे मरण!
रयतेचे राज्य येण्या महान छत्रपती शिवरायांचे करा अहोरात्र स्मरण!
साजरी करता शिवजयंती पुजावे छत्रपतीशिवरायांचे चरण!
सदैव सुजलाम सुफलाम राहो हि भुमी हेच असावे लोकशाहीचे धोरण !
रयतेचे राज्य येण्या घरोघरी बांधा छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे मंगल तोरण !
आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता