श्री.संतसेना नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी महेश वारूळे तर व्हा. चेअरमनपदी नवनाथ अपुणे यांची निवड….!

श्री.संतसेना नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी महेश वारूळे तर व्हा. चेअरमनपदी नवनाथ अपुणे यांची निवड….!

0
129

महेश वारुळे. चेअरमन नवनाथ अपुणे व्हा. चेअरमन

श्री संतसेना नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी महेश वारूळे तर व्हा. चेअरमनपदी नवनाथ अपुणे यांची निवड….!

श्री. संतसेना नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवड‌णुक सहायक निबंधक निवडणुक निर्णय अधिकारी अमर गायकवाड यांच्या उपस्थितीत बिनविरोध चेअरमन म्हणून महेश वारूळे तर व्हा. चेअरमन म्हणुन नवनाथ अपुणे यांची एकमताने निवड करणेत आल्याचे जाहीर करण्यात आले.

याप्रसंगी नवनिर्वाचित सदस्य सुधाकर माने, सुरेश साळूखे , सचिन माने, दिलीप गारुळे, आकाश काळे, सदाशिव काशिद, राजु धोत्रे, बापूराव कचरे, गजानन आगवणे, सौ.अलका अपुणे , सौ. भामा शिंदे, उपस्थित होते. निवडणुक बिनविरोध निवड करणे करिता संस्थापक श्री. अनिल दळवी , माजी चेअरमन महेंद्र यादव तर तज्ञ संचालक किरण चौधरी मार्गदर्शन केले. आणि सभेचे कामकाज संस्थेचे सचिव राजेंद्र मोरे यांनी पार पाडले..

नवनिर्वाचित चेअरमन महेश वारुळे यांनी निवड झाल्याबद्दल सांगितले की संचालक आणि सभासद,ठेवीदार, कर्जदार , कर्मचारी वर्ग ,प्रतिनिधी याचे योगदान आहेच. तर तुम्हां सर्वांनीं माझ्यावर पून्ह्यादा टाकलेला विश्वास सार्थकी लावेल. व मी संस्थेसाठी दिलेले योगदान पुन्हा एकदा नव्या उमेदीने कामाला लागून आपण यापूर्वीचा अनुभव पाठीशी आहे.तो सार्थकी लावून संस्थेच्या जडणघडणीत मोलाचे अधिकचे योगदान देण्याचे करिता काम करेल असे मनोगत व्यक्त केले.

तर नवनिर्वाचीत व्हाईस चेअरमन नवनाथ अपुणे यांनी निवड झाल्याबद्दल सांगितले की संचालक मंडळ,सभासद ,ठेवीदार कर्जदार,कर्मचारी वर्ग प्रतिनिधी यांनी यापूर्वी चागले स्वच्छ प्रतिमेचा संस्थेचा कारभार विस्तार केला आहे.तोच विश्वास सार्थकी लावायचे करिता चेअरमन महेश वारुळे व आपण संस्थेसाठी सर्वसमावेशक संस्थेच भल, प्रगतीची रूपरेषा अखणी करून श्री. संतसेना नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रगतीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न सहकार्य करण्याचे आश्वासन मनोगतात सागितले…!
खेळीमेळीच्या वातावरणात निवडप्रक्रिया पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here