बारामतीच्या शहरात महावैष्णवांची मंदियाळी बारामतीचे संपूर्ण शहर कसे आज विठ्ठल… … विठ्ठल पांडुरंगाच्या नामघोषाने जय हरी विठ्ठल… ज्ञानोबा तुकाराम.. ज्ञानोबा तुकाराम.. ज्ञानोबा तुकाराम..!
नामघोषाने.. विठुरायाचा तो चालला गजर मोठा ..या अभंगाच्या भक्तीमय वातावरण व उष्णतेच्या त्रासाला न जोमानता केवळ पांडुरंगाच्या दर्शनाची आतुरता दर दरमजल करत एकेक टप्पा पार करून संत जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा आज बारामती विसावला ..!
या पालखी सोहळ्याचे बारामतीच्या विशीवर बारामतीचे आमदार महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार व सुनेत्रा पवार सपत्नीक पालखी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे गट विकास अधिकारी अनिल बागल शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते संस्था अनेक व बारामतीतील तमाम जनता या जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतोपर उपस्थित होते.
मोठ्या भक्तीमय वातावरणात विठू नामाच्या गजरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पुंडलिकावरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय या नामघोषात.. ज्ञानोबा तुकाराम चाल
धरत ..तर विविध मान्यवरांचे वतीने बारामतीत येणाऱ्या वैष्णवांचे स्वागत केले.
तमाम वैष्णवांच्या अलोट अशा गर्दीने बारामती अक्षरशः दुमदुमून गेली होती.
बारामती नगर परिषद च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही थाटामाटात पालखी सोहळ्याचे स्वागत .
या पालखी सोहळ्यास अनेक संस्था संघटना पदाधिकारी विविध स्तरातून किटचे वाटप चहा पोहे अल्पोपहार पाण्याच्या बाटल्या चिवड्याचे वाटप बिस्किट पुड्याचे फलाचे वाटप कपड्याचे वाटप विविध वस्तू प्रसादाचे वडापाव वारकऱ्यांना मोठ्या भक्तिमय वातावरणात वाटप करत होते.
वारकरी मंडळीही बारामतीत मोठ्या प्रमाणात झालेल्या स्वागतातून भारावून गेले. सोबतच अजितदादा पवार यांनी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सोबत फुगडी खेळून आणखीनच उत्साह भरला .. तर रथाचे सार्थ ही झाले. यावेळी तमाम महाराष्ट्रातील माझ्या शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी, भरभरून भरपूर पाऊस पडण्याचाकरिता देवाकडे अजित पवार यांनी याप्रसंगी विठुरायाला वैष्णवा करवी विनवणी केली .
पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागून राहिलेले वैष्णव वरूणराजाने लवकरच हजेरी लावण्याच्या करिता वैष्णवाची विठोबाला हाक… विठ्ठल विठ्ठल पांडुरंग…पांडुरंगा नामस्मरणाने माऊली माऊली तुकाराम.. नामघोषाने आज बारामतीचे शहर दुमदुमले होते.