श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर – संचालक मंडळ सार्वत्रिक निवडणूक २०२५: मतदान शांततेत पार, उत्स्फूर्त प्रतिसाद….! अजित दादा पवार यांनी आपल्या आईसवेत आज मतदान केले.
भवानीनगर (ता. इंदापूर) – येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (दि. १८ मे २०२५) मतदान प्रक्रिया शांततेत आणि उत्साही वातावरणात पार पडली. शेतकरी, सभासद, महिला आणि तरुण मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानात सहभाग घेतल्यामुळे परिसरात निवडणुकीचे जणू एक सणाचे वातावरण होते.
मतदानाची अंतिम आकडेवारी पुढील प्रमाणे….




सकाळी ८ वाजल्यापासून सुरू
झालेली मतदान प्रक्रिया सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु होती. सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने मतदान पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व पोलिस प्रशासन सतर्क होते.
उत्सुकता शिगेला – मतमोजणी
या निवडणुकीत अनेक दिग्गज, युवा नेतृत्व आणि महिलांनी रिंगणात उडी घेतल्यामुळे मतमोजणीसाठी सर्वांच्या नजरा लागून आहेत. मतमोजणीची प्रक्रिया दि. १९ मे २०२५ रोजी होणार असून, कोणता पॅनल बाजी मारतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
राजकीय गोटात हालचालींना वेग!
मतदान संपताच विविध गट-तटांमध्ये बैठकींची लगबग सुरू झाली आहे. गणिते, अंदाज, ‘विनिंग कॉम्बिनेशन’च्या चर्चा रंगू लागल्या असून, भवानीनगर परिसरात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे.
जनतेचा कौल कोणाच्या बाजूने जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे!
