श्रीकृष्ण हा आस्था व श्रध्देचा विषय:कवी सुभाष पवार
श्रीकृष्ण हा आस्था व श्रध्देचा विषय असून श्रीकृष्णाच्या लीला अगाध आहेत असे मत कवी सुभाष पवार यांनी धोडंबे येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
येथील मविप्र समाजाचे क का वाघ हायस्कूल येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.कवी पवार यांनी पुढे सांगितले की श्रीकृष्णाच्या लीला म्हणजे एक निष्पाप बालकाचा खेळकरपणा, नटखटपणा व खोडकरकपणा होता ज्यामुळे संपूर्ण गोकुळात चैतन्य पसरले होते.सवंगड्यासोबत त्यांचे चोरी करणे ह्याला दहीहंडीच्या रुपात आज सामाजिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
यावेळी सूर्यवंशी आर जी यांनी निघाल्या मथूरेला गवळणी ही गवळण तर कवी सुभाष पवार यांनी बाजाराला विकण्या निघाली ही गवळण सादर केली.यावेळी विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले होते.
मुख्याध्यापक एस एम वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी भगवान श्रीकृष्णांचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमास पर्यवेक्षक पवार एस एस, ज्येष्ठ शिक्षक रकिबे के के,शिंदे बी एल,शेवाळे के एन,थोरात आर के,जाधव एस एस, गायकवाड एस एच, सोनवणे एस के शिंदे एस एल,चीताळकर जे एस, सोरते व्हि व्हि,कदम एम बी,महाजन जी डी,चौधरी जे जी,ठाकरे एस ए, प्रज्योत बागुल,