शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकाससारख्या क्षेत्रांसाठीकृत्रीम बुद्धीमत्तेचे स्वतंत्र कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत– उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

0
5

शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकाससारख्या क्षेत्रांसाठी
कृत्रीम बुद्धीमत्तेचे स्वतंत्र कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत
— उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

‘मायक्रोसॉफ्ट’सारख्या कंपन्यांकडून मिळणाऱ्या कृत्रीम बुद्धीमत्ता कौशल्यवृद्धी सहकार्यात
उद्योग, तंत्रशिक्षण, कौशल्यविकास विभागांनी मार्गदर्शक, समन्वयकाची भूमिका बजावावी
— उपमुख्यमंत्री अजित पवार

शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य क्षेत्रांमध्ये
कृत्रीम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचाचा वापर वाढवणे काळाची गरज
— उपमुख्यमंत्री अजित पवार

कृत्रीम बुद्धीमत्ता क्षेत्रात कौशल्यवृद्धीसाठी मदत करणाऱ्या
मायक्रोसॉफ्टसह सर्वांचे स्वागत, सर्वांनासहकार्याची भूमिका
— उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 5 :- शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकास अशा अनेक क्षेत्रांना कृत्रीम बुद्धीमत्तेचे (एआय) ज्ञान असलेल्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि संबंधित शासकीय विभागांनी चर्चा करुन कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी, पदव्यूत्तर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असावेत. अभ्यासक्रम तयार करण्यासाठी उद्योग, तंत्रशिक्षण, कौशल्यविकास विभागांनी मार्गदर्शक, समन्वयकाची भूमिका बजावावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

फोटोओळ :- ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि राज्य शासन यांच्यातील सामंजस्य करारानुसार राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रे स्थापन करण्यासह एआय तंत्रज्ञानाच्या वापर वाढवणे आणि अनुषंगिक मुद्यांवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (5 मे रोजी) मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला कौशल्यविकास, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, नियोजन विकास विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, कौशल्यविकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटीया, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, उद्योग सचिव डॉ. अनबलनग पी., एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, मायक्रोसॉफ्टच्या उद्योग संचालक व कृषी तज्ञ सपना नौहारिया, रतन टाटा कौशल्यविकास विद्यापीठाच्या कुलगुरु अपूर्वा पालकर, कौशल्यविकास आयुक्त नितीन पाटील, बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलावडे, विद्या प्रतिष्ठानचे किरण गुजर आदींसह शेती, उद्योग, व्यापार, माहितीतंत्रज्ञान, कौशल्यविकास आदी क्षेत्रातील तज्ञ तसेच शासनाच्या संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रे स्थापन करण्यासह एआय तंत्रज्ञानाच्या प्रभावी उपयोगासाठी ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि राज्य शासन यांच्यात सामंजस्य करार झाला असून एआय सेंटर्स ऑफ एक्सलन्समुळे प्रशासनात कार्यक्षमता, पारदर्शकता, डिजिटल साक्षरता वाढणार आहे. नॉयडातील मायक्रोसॉफ्ट सेंटर ऑफ एक्सलन्स आणि तेलंगणातील हैदराबाद इथल्या गुगुलच्या आयटी पार्कच्या धर्तीवर बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकारातून शहरात आयटी पार्क किंवा इनोव्हेशन सेंटर उभारण्याचा प्रयत्न असून त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीला कौशल्यविकास, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, नियोजन विकास विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, कौशल्यविकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटीया, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, उद्योग सचिव डॉ. अनबलनग पी., एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, मायक्रोसॉफ्टच्या उद्योग संचालक व कृषी तज्ञ सपना नौहारिया, रतन टाटा कौशल्यविकास विद्यापीठाच्या कुलगुरु अपूर्वा पालकर, कौशल्यविकास आयुक्त नितीन पाटील, बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलावडे, विद्या प्रतिष्ठानचे किरण गुजर आदींसह शेती, उद्योग, व्यापार, माहितीतंत्रज्ञान, कौशल्यविकास आदी क्षेत्रातील तज्ञ तसेच शासनाच्या संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विद्या प्रतिष्ठानच्या बारामतीतील प्रस्तावित सेंटर ऑफ एक्सलन्स ऑफ आर्टीफिशिएल इंटलिजन्स केंद्रासोबत राज्यात मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा उभारणे, बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात कृत्रीम बुद्धीमत्ता वापराचे प्रशिक्षण सुरु करणे, कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे, मायक्रोसॉफ्ट व शासनाच्या सहकार्यातून ज्ञान व माहितीचे आदान-प्रदान, एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, डिजिटील कौशल्यवृद्धी, संशोधन केंद्रे सुरु करणे, कर्करुग्णांवरील उपचारप्रक्रियेत वापरले जाणारे मायक्रोसॉफ्टचे इ-संजीवनी तंत्रज्ञान बारामतीतील वैद्यकीय महाविद्यालय, सिल्वर ज्युबिली रुग्णालय, राज्यातील अन्य रुग्णालयांना उपलब्ध करुन देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

राज्य शासनाचे सर्व विभाग, शेती, उद्योग, व्यापार, सहकार अशा अनेक क्षेत्रांमध्ये कृत्रीम बुद्धीमत्तेचा वापर वाढवणे ही काळाची गरज बनली असून या क्षेत्रात राज्याला मदत करण्यासाठी पुढे येणा्ऱ्या मायक्रोसॉफ्टसह सर्वांचे स्वागत करण्यात येईल. सर्वांना शक्य ते संपूर्ण सहकार्य, मदत केली जाईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here