शिवानी देशमुख हिची अंतराळ संशोधन संस्था ईस्त्रो मध्ये निवड
दोन जागांच्या मुलाखतीत एकमेव महाराष्ट्रीयन मुलीला प्राप्त सुयश हा बुलढाणा जिल्ह्याचा बहूमान!
अकोला– अंतराळ संशोधन कार्यात नेत्रदिपक कामगीरी करून आणि नुकत्याच झालेल्या चांद्रयान मोहिमेतून कुतूहलासह देशाला अभिमानास्पद यश मिळवून देणाऱ्या ईस्त्रो या संशोधन संस्थेत ज्युनिअर रिसर्च फेलो ( जे आर एफ) म्हणून कु.शिवानी राजेश देशमुख कंझारेकर हिची निवड झाली आहे.यातील दोन पदासाठी हैद्राबाद येथे झालेल्या मुलाखतीमध्ये एकमेव महाराष्ट्रीयन मुलगी म्हणून बुलढाण्याच्या खामगांव तालूक्यातील कंझारा येथील
रहिवाशी असलेल्या शिवानी हिची झालेली निवड बुलढाणा जिल्ह्यासोबतच विदर्भाला प्राप्त झालेला एक बहूमान आहे.
शिवानी ही अमरावती येथे श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात सहाय्यक अधिव्याख्याता म्हणून सेवेत कार्यरत होती.तिचे वडील राजीव उर्फ निळकंठराव हिंमतराव देशमुख हे आर्वी येथे सिव्हील कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात.ती गव्हर्नन्स सायन्स इन्स्टिट्यूट या कॉलेजमधील पर्यावरण शास्त्रातील पदविकाधारक ( एम.एस् सी.) असून तिचे दहावी,बारावी पर्यंतचे शालेय शिक्षण हे आर्वी मध्ये झाले.
मुळातच बुध्दीने तल्लख आणि अभ्यासात हुशार असलेल्या शिवानीची पर्यावरण आणि संशोधन क्षेत्रात असलेली आवड आणि त्या जोडीला एकाग्रता आणि अभ्यासू वृत्ती जोपासण्याच्या कठोर प्रयत्नांमुळे ईस्त्रो संशोधन संस्थेत स्थानापन्न होण्याचे यश तिला प्राप्त झाले आहे. शाळा,महाविद्यालयातून शिक्षकांचे आणि आई वडिलांचे मार्गदर्शन आणि संस्कारामुळे आपणास ईस्त्रोपर्यंत पोहचता आल्याच्या भावना शिवानी हिने व्यक्त केल्या आहेत.
तिचे आई वडील सुद्धा कलेचे उपासक असून राजीव देशमुख हे एक उत्तम गायक व स्व.लता मंगेशकरांचे अनुयायी आहेत.लतादीदींवर " धरतीपर आयी सरस्वती...लता दीदी लता दीदी" हे गाणे रचून गाणारे प्रथम गीतकार गायक आहेत.लताजींना गुरूस्थानी हृदयात ठेऊन कलोपासना करतांनाच आपल्या घरात लताजींचे मंदिर बांधून त्यात त्यांची मुर्ती विराजमान करणारे ते प्रथम उपासक आहेत.तर आई सुध्दा एक उत्तम चित्रकार आहेत.