शारदाबाई पवार विद्यानिकेतन ज्युनिअर कॉलेजची उज्वल यशाची परंपरा कायम…!

0
7

शारदाबाई पवार विद्यानिकेतन ज्युनिअर कॉलेजची उज्वल यशाची परंपरा कायम!!!

एच. एस. सी. बोर्ड परीक्षा २०२५ मध्ये शारदानगर येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम राखली. महाविद्यालयातून 94.67 % गुण मिळवून सेजल बर्गे ही विद्यार्थिनी प्रथम आली. तर अनुष्का काळभोर 90.17% गुण तसेच गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून राज्यात प्रथम व महाविद्यालयात द्वितीय तर समृद्धी मोरे हिने 89.83% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. तसेच श्रुती क्षीरसागर गणितात तर सृष्टी नलावडे कृषी विज्ञान व तंत्रज्ञानमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवून राज्यात प्रथम आल्या. तसेच श्वेता लोणकर हिने ८९.६७% तर स्वप्नाली ढवळे हिने ८९.५०% गुण मिळविले.
या विद्यानिकेतन मध्ये मुला-मुलींसाठी एकत्र शिक्षण घेता यावे व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इ. ११ वी व १२ वी विज्ञान शाखेत कॉम्पुटर सायन्स, क्रॉप सायन्स व कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विषय घेऊन अभियांत्रिकी तसेच कृषीविषयक शिक्षण घेता यावे, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी व मेडिकल आणि फार्मसी शाखेला विद्यार्थ्यांना जाता यावे या हेतूने एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे संस्थेचे चेअरमन मा. राजेंद्र पवार, विश्वस्त मा. सुनंदाताई पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निलेश नलावडे, एच. आर. गार्गी दत्ता, समन्वयक प्रशांत तनपुरे, मुख्याध्यापक सूर्यकांत मुंडे व विभाग प्रमुख योगेश झणझणे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here