मा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त नटराज नाट्यकला मंडळ बारामती संस्थेच्या वतीने दिनांक 11 डिसेंबर च्या मध्यरात्री बारामती शहरांमध्ये फुटपातवरील इमारती बाहेर एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, भाजी मंडई, मंदिर, मज्जिद,समाज मंदिरे अदी ठिकाणी बाहेर झोपी गेलेल्या गरीब नागरिकांना ब्लॅंकेट तेथे जाऊन अंगावर घालण्यात आले. नटराज कला दालन येथे शरद रावजी पवार साहेब यांनी महाविद्यालयीन जीवनात 1958 साली बी.एम.सी.सी कॉलेज पुणे येथे केलेल्या स्नेहसंमेलनामध्ये “पडले सावरले “ही नाटिका सादर केली होती . यामधील” नेता ” या भूमिकेतील त्यांचे छायाचित्र लावण्यात आले असून त्याचे अनावरण साहेबांचे वर्गमित्र विठ्ठल शेठ मनियार यांच्या हस्ते करण्यात आले. या छायाचित्रामुळे साहेबांचा वेगळा पैलू तरुण पिढीला समजेल असे विचार मनि यार यांनी व्यक्त केले. याप्रसंगी माधव जोशी, इसाक बागवान ,पौर्णिमा तावरे, नीलिमा गुजर ,डॉक्टर राजेंद्र शहा, अभिजीत जाधव ,सुधीर पानसरे अनेक मान्यवर उपस्थित होते. नटराज संस्थेच्या वतीने पवार साहेबांच्या यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 36 वर्षापासून एकांकिका स्पर्धाचे आयोजन केले जात आहे. या वर्षीच्या स्पर्धा दिनांक 17 व 19 डिसेंबर रोजी नटराज नाट्यमंदिर येथे होणार आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी दिली
शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नटराज च्या वतीने कौतुकास्पद उपक्रम …
शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नटराज च्या वतीने स्तुत्य उपक्रम ..