
शरद पवार साहेब गोविंद बागेत तर अजित पवार काटेवाडीत आपल्या कार्यकर्त्यांच्या , नागरिकांच्या सदिच्छा शुभेच्छा स्वीकारणार …..!
संतोष शिंदे भावनगरी
“पवार’ वलयकिंत बारामतीत यंदा दिवाळीच्या पाडव्याला वेगवेगळ्या ठिकाणी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी शरद पवार गट आणि अजित पवार गटात यंदा प्रथमच बदल… पाहायला मिळणार..?
यंदाच्या दिवाळीत बारामतीत राजकीय रंग अधिकच गडद दिसत आहे. यंदा २०२४ मध्ये प्रथमच दिवाळीच्या पाडव्याला पवार कुटुंबाच्या वेगवेगळ्या भेटीगाठीं च्या कार्यक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
अजित पवार यंदा काटेवाडीत कार्यकर्त्यांना, नागरिकांना भेटणार , तर ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे आणि यूगेंद्र पवार गोविंद बागेत आपल्या कार्यकर्त्यांसोबत नागरिकांशी संवाद भेट स्वीकारणार आहेत. असे कळते.
या बदलामुळे बारामतीतील राजकीय वातावरण तापलेचे अटळ झाले आहे. अनेक कार्यकर्त्यांना या भेटींमुळे मोठ्या घडामोडींची अपेक्षा आहे. असे यावरून समजते..!
बारामतीच्या राजकारणात यंदा दिवाळी पाडव्याला एक अनोखा आणि उत्सुकता वाढवणारा बदल पाहायला मिळणार आहे. शरद पवार आणि अजित पवार गटांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणी भेटीगाठींचे आयोजन केले आहे. अजित पवार काटेवाडीत आपल्या समर्थकांची सदिच्छा स्विकारतील, तर शरद पवार, सुप्रिया सुळे, आणि यूगेंद्र पवार गोविंद बागेत कार्यकर्त्यांना भेटणार आहेत.
या वेगळ्या कार्यक्रमामुळे बारामतीच्या राजकारणात चर्चा आणि चर्चा वाढल्या आहेत. कार्यकर्त्यांमध्ये या भेटींवरून आगामी राजकीय बदलांची शक्यता वर्तवली जात आहे, तर काहींनी याचे राजकीय संदेश काय उमटतील, याबाबत विचारमंथन सुरू केले आहे. बारामतीतील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात या भेटींमुळे असंतोष, संघटनात्मक बदल, तसेच आगामी निवडणुकांवरील परिणाम यावरही चर्चा सुरू झाल्या आहेत…!