शरद पवार : दिल्लीत आजही वजनदार नेता होय….!
राजकारण ही फक्त खुर्च्यांची चढाओढ नसून, त्यात सन्मान, संबंध आणि प्रतीकात्मक गोष्टींनाही महत्त्व असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांना खुर्ची देऊन बसवले आणि त्यांच्या पेल्यात पाणी भरून दिले, हा फक्त सौजन्याचा भाग नव्हता, तर तो पवार यांच्या दिल्लीत आजही कायम असलेल्या वजनाचा अप्रत्यक्ष सन्मान होता.
शरद पवार हे राजकीय खेळातील तज्ञ असून त्यांचा प्रभाव आजही दिल्लीत कायम आहे. भाजपला अनेकदा त्यांच्या राजकीय चातुर्याचा अनुभव आला आहे. महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून ते महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांपर्यंत, त्यांच्या रणनीतीने राष्ट्रीय राजकारण ढवळून निघाले. त्यामुळेच मोदींसारख्या ताकदवान नेत्यानेही त्यांना दिलेला सन्मान हा त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा आणि दिल्लीतील अजूनही असलेल्या राजकीय वजनाचा एक प्रतीकात्मक स्वीकार आहे.
ही घटना भाजप-राष्ट्रवादीच्या भविष्यातील समीकरणांची चाहूल तर देत नाही ना? याचा अंदाज येत्या काळात येईलच. पण एक गोष्ट नक्की—दिल्लीच्या राजकारणात शरद पवार यांना अद्यापही दुर्लक्षित करता येणार नाही.
