“शकील गवाणकर : सहकारातून समाजकारणाकडे… एक उत्तुंग प्रवास!”

0
11

“शकील गवाणकर : सहकारातून समाजकारणाकडे… एक उत्तुंग प्रवास!”
लेखक: संतोष शिंदे, संपादक – भावनगरी

रत्नागिरी जिल्ह्याच्या मातीतून उगम पावलेला एक झंझावात! पत्रकारितेपासून सहकार चळवळ, सामाजिक कार्य, पुरस्कारांची भरघोस कमाई आणि आजवरचा अभिमानास्पद प्रवास – हे सारे एका नावाभोवती गुंफलेले आहे… शकील गवाणकर!

१७ मे हा दिवस संपर्क युनिक फाउंडेशनच्या अध्यक्षांचा म्हणजेच शकीलभाईंचा वाढदिवस. या निमित्ताने त्यांच्या जीवनातील मैलाच्या दगडांचा आढावा घेताना मन अभिमानाने भरून येतंय.

शालेय जीवनातच पुरस्कारांची माळ गळ्यात घालणाऱ्या शकील गवाणकर यांनी B.A. (राज्यशास्त्र), पत्रकारिता (JCC), व लेखापरीक्षक (GDC & A) अशा विविध शैक्षणिक पदव्या मिळवत आपला शैक्षणिक ठसा उमटवला.
1984 मध्ये आकाशवाणी रत्नागिरीवर ‘युवा वाणी’ या कार्यक्रमात आवाजाची मोहिनी घालणारे शकीलभाई पुढे ‘बेस्ट टेलिव्हिजन’मध्ये वृत्तनिवेदकही झाले.

1993 साली महाराष्ट्र राज्य सहकारी संघात त्यांची निवड झाली आणि 22 जिल्ह्यांमध्ये सहकार शिक्षणाचा वटवृक्ष पसरवण्याची जबाबदारी त्यांनी लिलया सांभाळली. ‘सहकारी महाराष्ट्र’ मासिकाचे आणि ‘दि महाराष्ट्र को-ऑप क्वार्टर्ली’ इंग्रजी त्रैमासिकाचे संपादक म्हणून त्यांनी उत्तुंग योगदान दिलं.

त्यांच्या संपादकीय कामगिरीबद्दल 2001 साली नवी दिल्ली येथे उत्कृष्ट संपादक म्हणून गौरव झाला. आणि औरंगाबादच्या सहकार परिषदेत त्यांनी बनवलेला लघुपट ‘महाराष्ट्रातील सहकार चळवळीची वाटचाल’ आजही चर्चेचा विषय आहे.

पत्रकारिता, साहित्य, व्यंगचित्र, सहकार, समाजसेवा आणि कोविड योद्धा म्हणून त्यांना मिळालेले ३० पेक्षा अधिक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे त्यांचं कार्य किती व्यापक आणि बहुपेडी आहे याचा प्रत्यय देतात.

अनेक संस्थांचे प्रतिनिधी, एनजीओचे अध्यक्ष, “मेरा भारत समाचार”, “माय कोकण दापोली”, “भावनगरी बारामती” यांचे रत्नागिरी प्रतिनिधी, आणि त्यांच्याकडे असलेली विशेष कार्यकारी अधिकारी ही सरकारी मान्यता — हे सर्व त्यांचं लोकांशी असलेलं आत्मीय नातं अधोरेखित करतं.

2014 मध्ये त्यांनी लिहिलेलं पुस्तक ‘आठवणीतला सहकार’ हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवले गेलेलं ग्रंथरत्न आहे.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शतशः शुभेच्छा…
शकीलभाईंचा जीवनप्रवास नव्या पिढीला प्रेरणा देणारा आहे.
अशाच धगधगत्या कार्यातून त्यांचा “उत्तुंग प्रवास” अधिक तेजोमय व्हावा, हीच सदिच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here