विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाचा जिम्नॅस्ट मन कोठारी याची खेलो इंडिया युथ गेम्सच्या पदार्पणात अद्वितीय कामगिरी!
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे सुरू असलेल्या पाचव्या खेलो इंडिया युथ गेम्स, जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने भरघोस पदके जिंकून आपलं निर्विवाद वर्चस्व गाजविले. प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल, विलेपार्ले येथे प्रशिक्षण घेणारा सोळा वर्षीय जिम्नॅस्ट मन कोठारी याने प्रशिक्षक श्री विशाल कटकदौंड व श्री शैलेंद्र लाड यांच्या मार्गदर्शनाखाली खेलो इंडियामध्ये प्रथमच स्पर्धेत सहभागी होऊन आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स मधील हॉरिझोंटल बार आणि फ्लोअर एक्सरसाईज प्रकारात अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक पटकावले आणि अखिल भारतीय पात्रता फेरीत ते आठवे स्थान गाठले. तसेच अनुभवी सार्थक राऊळ याने सुद्धा शुभम गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली व्हॉल्टिंग टेबलवर रौप्यपदक पटकावले.
निशांत करंदीकर, आभा परब, अनुष्का पाटील, नीती दोशी यांनी सुद्धा सहभाग घेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. स्वरा गोडबोले हिने गोव्याचे प्रतिनिधित्व करत बॅलन्सिंग बीम व व्हॉल्टिंग टेबलवर अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान प्राप्त केले.
उत्तम दर्जाचे आयोजन, स्पर्धेचे थेट प्रक्षेपण यामुळे या स्पर्धेची एक वेगळी ओळख क्रीडाजगतात तयार होत आहे. श्री. अरविंद प्रभू (अध्यक्ष), डॉ. मोहन राणे (सचिव), नीलम बाबरदेसाई (जिम्नॅस्टिक्स क्रिडा प्रमुख) यांच्या पाठिंब्यामुळे सातत्याने राष्ट्रीय स्तरावर सहभाग व पदके मिळवण्यात प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाला यश प्राप्त होत आहे.
Home Uncategorized विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाचा जिम्नॅस्ट मन कोठारी याची खेलो इंडिया...