विलेपार्ले मुंबई येथील प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न
नारायण सावंत जेष्ठ पत्रकार मुंबई –
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल विलेपार्ले मुंबई या संकुलाची निर्मिती १९८८ साली मुंबईचे माजी महापौर/ माजी आमदार डॉ. रमेश यशवंत प्रभू यांनी केली आज या क्रिडा संकुलात विविध १९ क्रिडा प्रकारचे प्रशिक्षण तज्ज्ञ प्रशिक्षकांडून दिले जात आहे. संकुलाच्या निर्मितीचे व डॉ. रमेश प्रभू यांच्या ७ व्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याचेआयोजन करण्यात आले होते. या पारितोषिक वितरण सोहळ्यात ज्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय , राष्ट्रीय, राज्य, व जिल्हा स्तरावर उत्तम कामगिरी करून पदके प्राप्त करून संकुलाचे नाव उज्वल केले अशा सर्व खेळाडूंचे व त्यांच्या प्रशिकांचे रोख रक्कम व मानपत्र देऊन सन्मान या विभागाचे आमदार पराग आळवणी व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. खेळाडूंची व प्रशिक्षकांची नावे खालील प्रमाणे आहेत.
१) एअर रायफल शूटिंग – निमेश जाधव, आयोनिका पॉल, सायली मोरे, मनस्वी घाग, कीर्तना के.श्लोक हजारे, जयदेन डिमेलो खेळाडू स्नेहल पापलकर व जितेश कदम प्रशिक्षक
२) जिमनॅस्टिक ग्रुप १ – आभा परब, स्वरा गोडबोले, अलिशा टाककर, टियाना क्रास्टो, गितिका सालीयान, आश्रव वर्तक,जीत चव्हाण, जय तहसीलदार जिम्नॅस्टिक्स विभाग प्रमुख निलम बाबरदेसाई मुलांचे प्रशिक्षक शैलेंद्र लाड आणि मुलींचे प्रशिक्षक विशाल लोखंडे
जिमनॅस्टिक ग्रुप – २ निशांत करंदीकर , सार्तक राऊळ, आध्यान देसाई, जश पारीख, प्रसाद सालप खेळाडू – शुभंम गिरी प्रशिक्षक
जिमनॅस्टिकची ग्रुप – ३ अलिशा चौधरी, तनिष्का बॅनर्जी , वेदांती परब, मुग्धा मोरे खेळाडू – प्रशिक्षक –
वंदिता रावळ व मनीष शिंदे.
४) जलतरण – सिया देवरुखकर, नील जेटली, राघव जेटली, वेदांत कुमार, नमन कुकरेजा परम पुरोहित खेळाडू – प्रशिक्षक – संदीप नेवाळकर
३) डायव्हिंग – मनाली रेडकर, स्वराज लाड, नेहा पास्टे ,केया प्रभू, कबीर राव, अलीशा टाककर, क्षमा बंगेरा, अनुज शाह, खेळाडू – प्रशिक्षक – तुषार गितये
५) रोलर स्केटिंग – याशवी शाह,
राहुल येरुली, अमायरा गिलानी , रिवा अग्रवाल खेळाडू – प्रशिक्षक आदेश सिंग
६) बॉडी बिल्डिंग – निशांत नांनिवडेकर, प्रणव जाधव, शैलेश चोथे खेळाडू – प्रशिक्षक राजीव डिसूझा
७) पिकलबॉल – मयुर पाटील : खेळाडू व प्रशिक्षक
८) टेबल टेनिस – रिशा मिर चं दानी खेळाडू. – प्रशिक्षक नवीन वर्गीस
या प्रसंगी प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू, सचिव डॉ. मोहन राणे, विश्वस्त राजू रावळ, मकरंद येडूरकर, इत्याची उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकुलाचे सर्व विश्वस्त , सर्व कर्मचारी वर्ग सर्व प्रशिक्षक यांनी मेहनत घेतली. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन यशोधन देशमुख यांनी केले यावेळी एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.