विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अण्णा बनसोडे यांचा अर्ज दाखल

0
23

विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अण्णा बनसोडे यांचा अर्ज दाखल

मुंबई, दि. 25 मार्च 2025 – महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी उद्या (26 मार्च) होणाऱ्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह महायुतीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या पाठिंब्यामुळे बनसोडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडूनही उमेदवार देण्यात येणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here