विद्या राजाराम जाधव हिची रिलायन्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये निवड – ₹7.5 लाख पॅकेज

0
29

विद्या राजाराम जाधव हिची रिलायन्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये निवड – ₹7.5 लाख पॅकेज
विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल ब्रँचमधील 2025 बॅचची विद्यार्थिनी विद्या राजाराम जाधव हिची प्रतिष्ठित रिलायन्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये निवड झाली आहे. या निवडीसाठी विद्या राजाराम जाधव यानी प्रचंड मेहनत घेतली असून, तिला महाविद्यालयातील प्राध्यापक आणि टीपीओ टीमचे उत्कृष्ट मार्गदर्शन मिळाले.विद्याची रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये निवड ₹7.5 लाख वार्षिक पॅकेजसाठी झाली आहे.
विद्याच्या या यशामागे सेंट्रल टीपीओ डॉ. विशाल कोरे, कॉलेज टीपीओ श्री. सुरज कुंभार, सिव्हिल टीपीओ समन्वयक डॉ. रवि पाटील, महाविद्यालयातील प्राध्यापक व टी अँड पी टीमचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन आहे. विद्या नेहमीच स्वतःच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत होती आणि महाविद्यालयाने तिला योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले.
“रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या प्रतिष्ठित कंपनीत स्थान मिळवणे हे माझ्यासाठी एक स्वप्नवत क्षण आहे. यासाठी मी खूप मेहनत घेतली आणि महाविद्यालयाच्या प्राध्यापक व टीपीओ टीमचे विशेष आभार मानते,” असे विद्या जाधव यांनी सांगितले.
“विद्याच्या या यशाने महाविद्यालयाची प्रतिष्ठा वाढवली आहे. तिने घेतलेल्या कष्टाचे आज मोठे फळ मिळाले आहे. महाविद्यालयाच्या सर्व टीमचे हे सामूहिक यश आहे,” असे प्रभारी प्राचार्य डॉ. सुधीर लांडे यांनी सांगितले.
विद्याच्या यशाने महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here