विद्या प्रतिष्ठान बारामतीत ‘ट्रेन दि ट्रेनर्स’ प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी संपन्न

0
14

विद्या प्रतिष्ठान बारामती ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग अँड रोबोटिक ऑटोमेशनमध्ये रयत शिक्षण संस्था सातारा येथील प्राध्यापकांसाठी सहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी संपन्न
विद्या प्रतिष्ठान बारामतीच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग अँड रोबोटिक ऑटोमेशन येथे रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या विनंतीवरून २४ मार्च ते २९ मार्च २०२५ या कालावधीत ” ट्रेन दि ट्रेनर्स ” या विषयावर सहा दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला होता. रयत शिक्षण संस्था सातारा येथील विविध विद्याशाखांचे विभागप्रमुख व प्राध्यापक अशा एकूण १५ प्राध्यापकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या प्रशिक्षणामध्ये प्रामुख्याने ए आय, आयओटी, रोबॉटिक्स आणि थ्रीडी प्रिंटिंग या प्रमुख विषयांचा समावेश करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या सचिव ॲड. नीलिमा गुजर यांचे शुभ हस्ते करण्यात आले. सीओईचे प्रमुख प्रा. दादासाहेब रुपनवर व सीओईचे उप-प्रमुख प्रा. केशव जाधव तसेच प्रयोगशाळा सहाय्यक श्री. सुदाम कढणे हे या प्रशिक्षण सत्राचे समन्वयक होते. हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी यंत्र अभियांत्रिकीच्या विभागप्रमुख डॉ. मनिषा लांडे, तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सिम्युसॉफ्ट कंपनीचे संचालक श्री. सुनील चोरे आणि त्यांच्या तंत्रज्ञांनी सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले. कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here