विद्या प्रतिष्ठान बारामती येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे देऊळगाव रसाळ येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर संपन्न
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे तसेच विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय व वसंतराव पवार विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर देऊळगाव रसाळ येथे दि. २० ते २६ जानेवारी २०२5 दरम्यान आयोजित करण्यात आले. या शिबिरादरम्यान ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, लोकसंख्या नियंत्रण जनजागृती, कायदेविषयक सल्ला शिबिर, अटल भूजल योजना जनजागृती, मतदान जनजागृती, ग्रंथ दिंडी, पथ-नाट्य, महिला व ग्रामस्थ यांचेसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध तज्ञ मान्यवरांची डीजिटल भारतासाठी युवांचे योगदान, पर्यावरण व जैवविविधता, लोकशाहीतील सहभाग व जनजागृती, छत्रपती संभाजी महाराज, योग व आहार विहार, मृदा व जलसंवर्धन, अक्षय ऊर्जा, लिंगभाव संवेदनशीलता, अध्यात्म व विद्यार्थी या विविध विषयांवरील व्याख्याने असे उपक्रम राबविण्यात आले. तसेच याच दरम्यान एक दिवसीय आरोग्य चिकित्सा हे शिबिर आयोजित करण्यात आले. यात १८० ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची तपासणी करून आवश्यक ते उपचार करण्यात आले. सरपंच सौ. मीराबाई रसाळ, उपसरपंच श्री. सल्लाउद्दीन इनामदार, ग्रामपंचायत अधिकारी श्री. दीपक बोरावके यांच्या सहकार्याने प्रभारी प्राचार्य डॉ. सुधीर लांडे, प्राचार्य डॉ. अतुल शहाणे यांचे मार्गदर्शनात कार्यक्रम अधिकारी प्रा. दीपक सोनवणे, प्रा. विकास बनसोडे व स्वयंसेवक यांनी समाजोभिमुख योगदान दिले. या शिबिरादरम्यान जेष्ठ ग्रामस्थ श्री. आनंद रसाळ, श्री. हनुमंत रसाळ, श्री. दिपक वाबळे, श्री. दत्तात्रय लोंढे, श्री. शिरीष वाबळे, श्री. संतोष रसाळ, वसंतराव पवार माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. विलास तावरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. सतिष काकडे, श्री. अमोल लोंढे व समस्त ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य प्राप्त झाले.