विद्या प्रतिष्ठानच्या इंजिनिअरिंग महाविद्यालयातील अंजली अभंग हिची एच.एस.बी.सी. मध्ये निवड – ९ लाखांचे वार्षिक पॅकेज

0
24

विद्या प्रतिष्ठानच्या इंजिनिअरिंग महाविद्यालयातील अंजली अभंग हिची एच.एस.बी.सी. मध्ये निवड – ९ लाखांचे वार्षिक पॅकेज
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय, बारामतीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी अंजली अभंग हिची प्रतिष्ठित एचएसबीसी (हाँगकाँग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन) कंपनीमध्ये वार्षिक ९ लाखांच्या पॅकेजवर निवड झाली आहे.
या यशाबद्दल केंद्रीय प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. विशाल कोरे, महाविद्यालयाचे प्रशिक्षण प्लेसमेंट अधिकारी श्री. सूरज कुंभार आणि विभागीय समन्वयक श्री. प्रदीप घोरपडे यांनी अंजलीचे कौतुक केले आहे.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुधीर लांडे यांनी अंजलीला तिच्या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले असून, तिच्या भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी महाविद्यालयाच्या टी अँड पी सेलच्या प्रभावी प्रयत्नांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांमध्ये निवडीच्या संधी निर्माण होत आहेत. संस्थेच्या सर्व विश्वस्तांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here