विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामतीचे माजी विद्यार्थी प्रसाद घोंगडे यांचे व्याख्यान
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटने मार्फत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांकरिता २००४ बॅचचा आयटी विभागाचा माजी विद्यार्थी श्री प्रसाद घोंगडे (वरिष्ठ तांत्रिक पीएम, बोकू नेटवर्क सर्व्हिसेस, इंडिया प्रा. लि.) यांचे “तुमच्या भविष्याकडे असे पाहाल” या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.
त्यांनी सर्वाना समजेल उमजेल अशा ओघवत्या भाषेत अत्यंत सुश्राव्य असे विचार मांडले. यामध्ये त्यांनी आजवरच्या त्याच्या जीवनातील अनेक अनुभव कथन केले. तसेच आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय येतं यापेक्षा काय आवडतं याला महत्त्व द्या आणि त्याच्यामध्येच आपलं भवितव्य घडावा असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
तसेच त्यांनी नोकरी आणि व्यवसाय याच्या मधील जबाबदारी तसेच त्याच्या मधील चढउतार याची माहिती दिली. आर्थिक साक्षरता म्हणजे काय? आर्थिक साक्षरता का महत्त्वाची आहे? भारतातील आर्थिक साक्षरतेची सर्वात मोठी आव्हान कोणकोणती आहेत, आर्थिक साक्षरतेचा भविष्यावर कसा परिणाम होतो.
मालमत्ता विरुद्ध दायित्वे या सर्व मुद्द्यांवर त्यांनी इतंभूत चर्चा केली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर, उपप्राचार्य डॉ. सुधीर लांडे, माजी विद्यार्थी संघटनेचे अधिष्ठता डॉ. चित्रगार, संगणक विभागाचे विभागप्रमुख डॉ. चैतन्य कुलकर्णी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा विज्ञान (AIDS) या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. प्रदीप पैठणे तसेच प्रा. केशव जाधव, डॉ. बिपीन गावंडे, प्रा. मोना यादव, प्रा. संतोष करे, प्रा. पी. एम. पाटील आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. चित्रगार, यांनी केले आणि हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.