विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथील तृतीय, चतुर्थ वर्ष अभियांत्रिकी शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर लांडे, दौंड तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दडस, डॉ. परशुराम चित्रगार तसेच व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्राचार्यांच्या शुभहस्ते करण्यात आला. प्रमुख वक्ते उपविभागीय पोलीस अधिकारी दडस यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी आपल्या मार्गदर्शन पर व्याख्यानामध्ये दुष्काळग्रस्त तालुक्यात आणि शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन व ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेतील शिक्षण म्हणजेच शालेय जीवनापासून अधिकारी होण्यापर्यंतचा संघर्षमय, खडतर जीवन प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले ध्येय निश्चित करून त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल केली आणि कठोर परिश्रम घेतले तर आपल्याला यश हे निश्चित मिळतेच असा दृढ आत्मविश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला. तसेच त्यांनी सद्य परिस्थितीवर भाष्य करताना समाजात वाढलेली गुन्हेगारी, महिलांवर होणारे हल्ले आणि अन्याय तसेच सायबर गुन्हेगारी या विषयावर त्यांनी प्रकाश टाकला. गुन्हेगारी रोखण्यासाठी आपण काय उपाययोजना केली पाहिजे याची देखील त्यांनी माहिती दिली. या महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एमपीएससी, यूपीएससी, या शासकीय स्पर्धा परीक्षांची तयारी करून मोठे अधिकारी व्हावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. परशुराम चित्र गार यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहाय्यक प्रा. हाफिज शेख, शशांक बिरादार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी सुरज कुंभार, मोना यादव यांनी विशेष कष्ट घेतले.

