विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती येथे राष्ट्रीय ग्राहक दिन व राष्ट्रीय रस्ता सुरक्षा या विषयी मार्गदर्शन

0
13

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती येथे राष्ट्रीय ग्राहक दिन व राष्ट्रीय रस्ता सुरक्षा या विषयी मार्गदर्शन
राष्ट्रीय ग्राहक दिन व राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह या दोन्ही दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय ग्राहक पंचायत, बारामती तालुका व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती या दोघांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात विद्यार्थ्यांकरता मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच उपस्थित मान्यवरांचे स्वागत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन विभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब पाटील यांचे हस्ते करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोर्णिमा विद्या, यांनी केले.
अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत,पुणे जिल्हा तुषार झेंडे पाटील यांनी ग्राहकांचे हक्क व अधिकार आणि सायबर क्राईम या विषयावर विद्यार्थांना मार्गदर्शन केले. तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सुरज पाटील यांनी रस्ते सुरक्षा अपघात या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळेस सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रज्ञा ओंमासे यांनी वाहन सुरक्षा बाबत उपस्थित असणाऱ्या सर्वांना प्रतिज्ञा दिली.
सदर कार्यक्रमास दिलावर तांबोळी,सदस्य पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण,पुणे, महाविद्यालयाचे प्रभारी
प्राचार्य डाॅ.एस. बी.लांडे, प्रा. राजवीर शास्त्री, अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती तालुक्याचे अध्यक्ष संजीव बोराटे, उपाध्यक्ष प्रशांत जगताप , संघटक सतीश खंडाळे. सहसचिव युवराज इंदलकर, नानासाहेब तावरे, बाबासाहेब शिंदे, चेतन मोहिते, सचिन चौधर आदि सदस्य उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिवेंद्र जगदाळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्तांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here