विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची इन्फोसिस या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये 3.6 लाख पॅकेजसाठी कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड

0
31

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची इन्फोसिस या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये 3.6 लाख पॅकेजसाठी कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयात इन्फोसिस नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये दिशा सुराणा-बीई इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, किरण वाबळे- बीई कॉम्प्युटर, साक्षी पाटील- बीई आयटी, समृद्धी सूर्यवंशी- बीई आयटी या अंतिम वर्षात शिकणाऱ्या चारही विद्यार्थ्याची 3.6 लाख पॅकेजसाठी प्लेसमेंटद्वारे निवड झाली आहे. हा कॅम्पस ड्राईव्ह यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सेंट्रल टीपीओ डॉ. विशाल कोरे, अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी (टीपीओ) प्रा. सुरज कुंभार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. तसेच या प्लेसमेंट करिता प्रा. व्यंकटेश रामपूरकर, प्रा. संतोष करे, प्रा. मयूर गावडे, डॉ. रवी पाटील या सर्वांनी विशेष कष्ट घेतले . या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुधीर लांडे तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here