विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथील डॉ. निर्मल साहूजी यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती येथील फिजिक्स या विषयाचे प्रोफेसर डॉ. निर्मल साहूजी यांनी अध्ययन अध्यापनाच्या क्षेत्रातील सेवाकाळ पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या सपत्नीक सत्काराचे आयोजन महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी शाखे मार्फत करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. दीपक सोनवणे यांनी केले. सत्कारमूर्ती डॉ. निर्मल साहूजी व त्यांच्या पत्नी सौ. वैशाली या दोघांचा सपत्नीक सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर व डॉ. अपर्णा सज्जन या दोघांच्या शुभहस्ते करण्यात आला. डॉ. निर्मल साहूजी हे गेले वीस वर्षापेक्षा अधिक काळ या महाविद्यालयात अध्ययन आणि अध्यापन करण्याचे काम करीत होते. त्यांनी या महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकी शाखेचे विभाग प्रमुख, शैक्षणिक अधिष्ठता, नॅकचे समन्वयक म्हणून तसेच विद्या प्रतिष्ठानचे कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय इंदापूर येथे प्राचार्य म्हणून असा वेगवेगळ्या प्रकारचा पदभार त्यांनी आपल्या सेवाकाळात अत्यंत यशस्वीपणे सांभाळला होता. त्यांच्या कार्यकाळात ते अत्यंत शिस्तीचे प्राध्यापक उत्तम प्रशासक आणि प्राचार्य म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या या सत्कार समारंभ प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर, उपप्राचार्य डॉ. सुधीर लांडे, प्रा. विकास देशमुख, सेंट्रल टीपीओ डॉ. विशाल कोरे, डॉ. अनिल हिवरेकर, डॉ. अपर्णा सज्जन, डॉ. अनिल डिसले, प्रा. रोहित तरडे, प्रा. गौरी भोईटे, डॉ. पी. आर. चित्रगार, शशांक दंडवते आदींनी डॉ. साहूजी यांच्याबरोबर काम करत असताना आलेले अनुभव तसेच जुन्या आठवणी कथन केल्या व त्यांना सेवानिवृत्तीनंतरच्या काळातील उत्तम आरोग्यासाठी व वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
Home Uncategorized विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथील डॉ....