विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती येथील माजी विद्यार्थी व प्राध्यापकाच्या पेटंटला भारत सरकारची मान्यता
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या प्रा. डॉ. ज्योती रांगोळे व महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेचा २०१९ बॅचचा माजी विद्यार्थी श्री. पैगंबर शेख यांच्या मल्टीपर्पज एग्ज हॅचरी मशीन वरील पेटंट या अविष्काराला भारतीय पेटंट कार्यालयाने अधिकृतपणे मान्यता दिलेली आहे, त्यामुळे त्या पेटंटच्या उत्पादनाविषयीचे तसेच त्याची खरेदी-विक्री आयात निर्यात व त्या उत्पादना वरील संपूर्ण मालकी हे सर्व अधिकार हे या दोघांना मिळालेले आहेत. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल विद्या प्रतिष्ठानचे सन्माननीय विश्वस्त मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब पाटील तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग या सर्वांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.