विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती येथे “अटल एफ डी पी” कार्यक्रम यशस्वी संपन्न…

0
14

अटल एफ डी पी ” कार्यक्रमात उपस्थित प्राध्यापकांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर एस बिचकर

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती येथे “अटल एफ डी पी” कार्यक्रम यशस्वी संपन्न
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती येथे स्थापत्य अभियांत्रिकी शाखेमध्ये
एआयसिटी, नवी दिल्ली प्रस्तुत “अटल एफडीपी” हा कार्यक्रम 21 ऑक्टोबर 2024 ते 26 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचा मुख्य विषय “एप्लीकेशन ऑफ स्ट्रक्चरल डायनॅमिक्स इन ॲडव्हान्सड
सेन्सिंग टेक्नॉलॉजीस अँड एनर्जी हार्वेस्टिंग ऑफ स्ट्रक्चर्स बाय थेरी अँड एक्सपिरिमेंटस ” हा होता. या कार्यक्रमांमध्ये आयआयटी, एनआयटी, येथील विशेष विषयतज्ञ आणि शास्त्रज्ञ यांनी सहभाग घेऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांमध्ये विविध महाविद्यालयातील 55 प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला होता. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या कार्यक्रमाचे समन्वयक व डीन ऍटोनॉमी डॉ. चित्तरंजन नायक, स्थापत्य अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख डॉ. नागेश सूर्यवंशी तसेच स्थापत्य विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here