विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इंस्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथील डॉ. स्नेहल बाळकृष्ण वाळके यांना पी. एच. डी. पदवी बहाल
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इंस्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती या महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. स्नेहल बाळकृष्ण वाळके यांना स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी तळेगाव आंबी पुणे या विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. “Effect of Compression Reinforcement on Elastic properties of RCC” हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. त्यांनी हे संशोधन डॉ. अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले आहे. डॉ. स्नेहल वाळके ह्या या महाविद्यालयात गेली अकरा वर्षापासून कार्यरत आहेत. त्या या महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या पहिल्या महिला PhD पदवी प्राप्त सहाय्यक प्राध्यापक ठरल्या आहेत. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर, विद्याप्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त मंडळ तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग या सर्वानी डॉ. स्नेहल वाळके यांचे अभिनंदन केले आहे.