विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय, बारामती येथील डॉ. सौ. ज्ञानकमल जितेंद्र छाजेड यांना पीएच. डी. पदवी प्रदान
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इंस्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथील डॉ. सौ. ज्ञानकमल जितेंद्र छाजेड यांना कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांचा संशोधनाचा विषय “अ नॉव्हेल अँप्रोच टू डेटा हाईडींग इन बायनरी इमेजेस फॉर सीक्रेट कम्युनिकेशन अँड ऑथेंटिकेशन” हा होता. त्यांनी हे संशोधन भारती विद्यापीठ डिम्ड टु बी युनिव्हर्सिटी, पुणे येथून डॉ. बिंदू गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले आहे. डॉ. सौ. ज्ञानकमल छाजेड ह्या या महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागात वरिष्ठ प्राध्यापिका आहेत व त्यांनी राष्ट्रीय पातळीची GATE परीक्षा ९६.२६ टक्केवारीत उत्तीर्ण करून IIT, हैदराबाद येथे पीएच.डी. करण्यासाठी संधी मिळवली होती. त्यांनी पीएच. डी. दरम्यान २ पेटंटस, २ Scopus/ESCI जर्नल पेपर्स, ४ Springer/ IGI Global, Scopus बुक चॅप्टर्सस, ४ कॉन्फरेन्स Springer/IEEE इंटरनॅशनल लेवल पेपर्स प्रकाशित केले. त्यांनी ह्या काळामध्ये आपल्या कॉलेजच्या संपूर्ण जबाबदाऱ्या प्रभावीपणे सांभाळून हे यश मिळवले आहे. डॉ. सौ. ज्ञानकमल छाजेड यांनी कॉलेजमधे संगणक विभाग प्रमुख, यूनिव्हर्सिटीचे परीक्षेत इंटर्नल/एक्सटर्नल सिनियर सुपरव्हायझर, NBA विभाग कोऑर्डिनेटर, Purchase डिपार्टमेंट प्रमुख सारख्या अनेक जबाबदाऱ्या यशस्वी रित्या पार पडल्या आहेत. ह्या या महाविद्यालयाच्या उत्तम प्राध्यापिका, मार्गदर्शिका व विभागप्रमुख म्हणून ओळखल्या जातात. त्या विद्यार्थ्यांना नेहमी सर्वांगीण विकासासाठी प्रोत्साहित करत असून विद्यार्थ्यांच्या प्रेरणास्थान आहेत. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. श्री. आर. एस. बिचकर, विद्याप्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त मंडळ तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग या सर्वानी डॉ. सौ. ज्ञानकमल छाजेड यांचे अभिनंदन केले आहे.