विद्या प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथे जागतिक महिला दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न

0
90

विद्या प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथे जागतिक महिला दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न


विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, बारामतीचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, वसंतराव पवार विधी महाविद्यालय व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने ०६ मार्च २०२४ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सौ सुनेत्रा वहिनी पवार यांच्या शुभहस्ते तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस बिचकर, विद्याप्रतिष्ठानचे वसंतराव पवार विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल शहाणे, स्कुल ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या आर. राजश्री पाटील, डॉ. सुधीर लांडे, डॉ. राजवीर शास्री, डॉ. बाळासाहेब पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. सुनेत्रा वहिनी पवार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून रक्तदानाचे महत्व व त्याची समाजासाठी असणारी गरज पटवून दिली. कोणत्याही समाज उपयोगी कार्यासाठी कोणत्याही एका विशिष्ट तारखेची किंवा दिवसाची गरज असू नये, तर येणारा प्रत्येक दिवस हा जागतिक महिला दिन आहे असे समजून असे उपक्रम हे सतत वारंवार घेतले जावेत. तसेच रक्तदान सारख्या या स्तुत्य उपक्रमांमध्ये जास्तीत विद्यार्थ्यांना, युवकांना सहभागी करून घ्यावे. विद्यार्थ्यांना आपले शिक्षक, आई-वडील, महाविद्यालय याचा रास्त अभिमान असला पाहिजे. हिंदू संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दान आणि त्याचे महत्त्व दिलेले आहे परंतु रक्तदान हे अत्यंत सर्वश्रेष्ठ दान आहे त्यामध्ये आपले योगदान असले पाहिजे. तसेच आजची तरुण पिढी हे देशाचे भविष्य आहे त्यामुळे ती अत्यंत संस्कारक्षम असली पाहिजे. महिला दिनाच्या निमित्ताने फक्त महिलांचे सबलीकरण करणे हे गरजेचे नसून त्याबरोबर पुरुष वर्गाची देखील मानसिकता बदलली पाहिजे कारण स्त्री आणि पुरुष हे एकाच गाडीची दोन चाक आहेत आणि त्यामुळे जर त्यांच्यामध्ये समतोल आणि समानता असेल तरच आपण आपला विकास साधू शकतो असे मौलीक विचार त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून मांडले. या शिबिरामध्ये विद्याप्रतिष्ठान संस्थेच्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अशा जास्ती जास्त रक्तदात्यानी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या शिबिरामध्ये एकूण २१० रक्ताच्या बाटल्याचे संकलन करण्यात आले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रा. दीपक सोनवणे, प्रा. विकास बनसोडे, प्रा. अशोक भुंजे तसेच विद्यार्थी चेतन काकडे, ऋतुराज काळे, सुरज थोरात, ऋतुराज बोंदरे व त्यांचे सर्व विद्यार्थी सहकारी मित्र तसेच अक्षय फाउंडेशन बारामती यांची अक्षय रक्त पेढी, बारामती यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालायचे डॉ. निर्मल साहुजी, शशांक दंडवते, संतोष जानकर, डॉ. बिपीन पाटील, आदी आवर्जून उपस्थित होते. यासंपूर्ण कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here