प्रतिनिधी : विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात दहा दिवसीय फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात तृतीय वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी इवायजीडीएसच्या सीएसआर अँक्टिव्हीटी अंतर्गत मोफत फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रशिक्षण हि कार्यशाळा १६ ऑक्टो. ते २० ऑक्टो. २०२३ व ०५ फेब्रु. ते ०९ फेब्रु. २०२४ या दोन टप्प्यात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत संगणक, आर्टीफिसेल इंटीलिजन्स आणि डेटा सायन्स, माहिती आणि तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या चार शाखेच्या एकुण १४६ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
हि कार्यशाळा महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लॅसेंटन्ट विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यासाठी इवायजीडीएस कडून श्री. हरी व शिवा आणि शशांक शेखर व महेश कुऱ्हे यांनी मार्गदर्शन केले. हे प्रशिक्षण आयोजित करण्याकरिता संस्थेचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. विशाल कोरे यांनी मदत केली. या प्रशिक्षणाची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरिता महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर सुरज कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच प्राचार्य डॉ. रा. स. बिचकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व विभाग समन्वयक, चारुदत्त दाते, दादा तावरे, वैभव भोसले, रुपाली झारगड व प्रवीण नगरे यांचे सहकार्य लाभले.
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात तृतीय वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी इवायजीडीएसच्या सीएसआर अँक्टिव्हीटी अंतर्गत मोफत फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रशिक्षण कार्यशाळा
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात तृतीय वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी इवायजीडीएसच्या सीएसआर अँक्टिव्हीटी अंतर्गत मोफत फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रशिक्षण कार्यशाळा