विद्या प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथे “भव्य रक्तदान शिबीर संपन्न.

0
186

प्रतीनीधी: BHAVNAGARI

विद्या प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथे “भव्य रक्तदान शिबीर संपन्न.
विद्या प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामतीच्या विद्यार्थी विकास कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०२ फेब्रुवारी २०२३ रोजी महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस बिचकर, डॉ. भरत शिंदे, प्राचार्य विद्याप्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, डॉ अतुल शहाणे, प्राचार्य विद्याप्रतिष्ठानचे वसंतराव पवार विधी महाविद्यालय तसेच बारामतीचे विद्यमान नगरसेवक श्री. जय पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. उपस्थितीत मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून रक्तदानाचे महत्व व त्याची समाजासाठी असणारी गरज पटवून दिली. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी सामाजिक जाणीव ठेवून रक्तदानासारखा स्तुत्य उपक्रम राबवत आहेत ही समाधानकारक गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली. या शिबिरामध्ये विद्याप्रतिष्ठान संस्थेच्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अशा एकूण १५२ रक्तदात्यानी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या शिबिरामध्ये एकूण १५२ रक्ताच्या बाटल्याचे संकलन करण्यात आले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रा. दीपक सोनवणे, प्रा. उमेश जगदाळे, प्रा. विकास बनसोडे तसेच विद्यार्थी सागर शेंडगे, स्वप्नील झारगड, निखिल भोंग, अभिषेक खामकर व त्यांचे सर्व विद्यार्थी सहकारी मित्र तसेच मुक्ताई ब्लड बँक इंदापूर यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालायचे उपप्राचार्य डॉ. सुधीर लांडे, डॉ. बाळासाहेब पाटील प्रा. रोहित तरडे, प्रसारमाध्यम विभागाचे समन्वयक श्री. सुनिल भोसले हे सर्वजण आवर्जून उपस्थित होते. यासंपूर्ण कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here