विद्या प्रतिष्ठानचे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती या महाविद्यालयाला नेट ॲकॅड एक्सलन्स पुरस्कार
१७ जानेवारी २०२५ रोजी सिस्को सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड, बंगळुरू झालेल्या सिस्को नेटवर्किंग अकादमी परिषदेसाठी महाविद्यालयाला आमंत्रित करण्यात आले होते. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सिस्को नेटवर्किंग मधील वेगवेगळे अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल महाविद्यालयाला नेट ॲकॅड एक्सलन्स पुरस्कार मिळाला. या परिषदेत एआय, सायबरसुरक्षा आणि नेटवर्किंग सारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये सिस्को नेटवर्किंग अकादमी उत्पादन पोर्टफोलिओमधील नवीनतम बाबींचा समावेश असलेले विविध मार्गदर्शन पर व्याख्याने झाली. महाविद्यालयातील सिस्को सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख तथा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब पाटील आणि सेंटरमधील टीम सदस्य डॉ. हाफिज शेख, प्रा. काजल खलाटे प्रा. प्रियांका कोकरे या सर्व प्राध्यापकांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुधीर लांडे यांनी प्राध्यापकांना परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी या कार्यक्रमासाठी पाठिंबा दिला.