विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करत महात्मा फुलेंना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
बारामती : येथे स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त बारामती नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आमराई परिसरातील अनंत नगर येथील अभ्यासिकेमध्ये विध्यार्थ्यांना शालेयपयोगी साहित्य आणि अल्पपोहराचे वाटप शेरसुहास मित्र मंडळाच्या वतीने माजी नगरसेवक किशोर शिवरकर यांच्या हस्ते करत महात्मा ज्योतिबा फुले यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले.
आपल्या देशातील असमानतेची व्यवस्था नष्ट करून महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवत समाजामध्ये समानता प्रस्थापीत करण्यासाठी प्रयत्न केले.मागासलेल्या वर्गातील मुला-मुलींना शिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम महात्मा फुले यांनी केले.त्यांच्या याच क्रांतिकारी कार्यापासून प्रेरणा घेत आम्ही या उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे यावेळी बोलताना आयोजक शुभम अहिवळे यांनी सांगितले.
याप्रसंगी जे या विध्यार्थ्यांना अभ्यासिकेमध्ये मोफत शिकवतात ते प्रा.विश्वास लोंढे,सुधीर साळवे,शेरसुहास मित्र मंडळाचे सदस्य सिद्धार्थ लोंढे,नितीन गव्हाळे,संतोष लोंढे,रोहित वाघमोडे,राज टेकवडे आदी उपस्थित होते.