मी मॉड्रिक, मेस्सी, पेपे…; जगप्रसिद्ध आणि वर्ल्डकपविजेत्या खेळाडूचा फुटबॉलला अलविदा….!

0
204

मी मॉड्रिक, मेस्सी, पेपे…; जगप्रसिद्ध आणि वर्ल्डकपविजेत्या खेळाडूचा फुटबॉलला अलविदा….!

स्पेनचा आणि पीएसजीचा फुटबॉलपटू सर्जिओ रामोसने ने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. टीमच्या मॅनेजनरने फोन वरून बोलून त्याने हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. रामोसने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून देखील याची माहिती दिली आहे. यावेळी रामोस भावूक झाल्याचं दिसून आलं आहे.

निरोप घेण्याची वेळ आली- रामोस
ट्विटरवरून रामोसने एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने दोन पत्र आणि स्पेनच्या जर्सीतील एक फोटो पोस्ट केलाय. यावेळी रामोसने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “माझ्या लाडक्या राष्ट्रीय टीमचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. टीमच्या कोचचा फोन आल्यानंतर त्यांनी मला टीममधून वगळण्याची बातमी दिली.”

स्पेनसाठी खेळले 180 सामने
रियल मॅड्रिडचा माजी खेळाडू आणि पेरिस सेंट-जर्मेनचा सध्याचा खेळाडू सर्जिओ रामोसने स्पेनसाठी एकूण १८० सामने खेळले आहेत. यानंतर आद त्याने निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली.

माझ्या क्रीडा प्रवासाचा शेवट- रामोस
ट्विटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये रामोसने नमूद केलंय की, माझ्या स्पोर्ट्सच्या प्रवासाचा शेवट होतोय. या गोष्टीचा मला अतिशय खेद आहे. माझा हा प्रवास मोठा असेल आणि टीमसाठी यशाची चव चाखता येईल, अशी मला आशा होती. मात्र मला आता असं वाटतंय की, वैयक्तिक निर्णयामुळे किंवा माझी कामगिरी आमच्या राष्ट्रीय टीमच्या पात्रतेनुसार नसल्यामुळे करिअर संपुष्टात आलं, वय किंवा इतर कारणांमुळे नाही.

रोमोस पुढे लिहीतो की, तरुण असणं हा गुण किंवा दोष नाही, ती केवळ एक तात्पुरती बाब आहे. दरम्यान याचा कार्यक्षमतेशी किंवा क्षमतेशी संबंध नाही. मी मॉड्रिक, मेस्सी, पेपे… फुटबॉलमधील परंपरा, मूल्ये, योग्यता आणि न्याय यांच्याकडे कौतुकाने आणि मत्सराने पाहतो. दुर्दैवाने माझ्यासाठी असं होणार नाही, कारण फुटबॉल नेहमीच न्याय्य नसतो आणि फुटबॉल हा फक्त फुटबॉल नसतो. या सर्व गोष्टींद्वारे मी हे दु:ख तुमच्यासोबत शेअर करु इच्छितो, परंतु या सर्व वर्षांसाठी आणि तुम्ही दिलेल्या समर्थनासाठी मी खूप खूप आणि खूप आभारी आहे, असंही रामोसने म्हटलंय.

Previous articleवैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
Next articleआपणही समाजात असं काही करतो का? समाजाला काही देतो का?
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here