लेणे…..
मी अडवळणी वाट..
तू सुसाट राज मार्ग …
मी अंधारातील झोपडी…
तू धरतीवरील स्वर्ग…१…
मी वळवावरचे थेंब ..
तू अथांग असा सागर ….
मी कोरडे वाळवंट …
तू ओसंडणारी घागर…२…
तू अमृताचा प्याला…
मी रिते रिते मडके…
तू संगमरवरी मंदीर …
मी जुनाट घर पडके….३…
तू पवित्र शुक्र तारा…
मी अंधारलेली अमावस…
तू चांदण्याचा सडा…
मी कोंदटलेला श्वास …४…
तुझे भरभरून वाहणे…
माझे सदा रडके गाणे…
तुझी कायम वादळावरी माथ…
माझे वादळ बघून वरती हात…५…
मिलन दोन किनार्याचे..
सांग सख्या कधी रे झाले..
वेड्या अंधाराने कधी ना..
दिवसाचे लेणे ल्याले…६…
राधिका जाधव-अनपट @
