लिनेस क्लब ऑफ बारामतीकडून पानवट्यात टँकरने पाणी पुरवठा.
कन्हेरी, तालुका बारामती येथील वन क्षेत्रातील पानवट्यात प्राण्यांसाठी लिनेस क्लब, बारामतीच्या वतीने पाणी सोडण्यात आले.
बारामती:- येथील ऑल इंडिया लेनेस क्लब ऑफ बारामतीकडून कन्हेरी तालुका बारामती नजीक वनक्षेत्रातील पानवट्यामध्ये मंगळवार दिनांक 15 रोजी टँकरने पाणी सोडण्यात आले.
बारामती तालुक्यात यंदा मार्चपासूनच कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. वन्य प्राण्यांसाठी पाण्याची नितांत गरज भासू लागली आहे. पानवटे कोरडे पडत असल्याने वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे.

हे लक्षात आल्यामुळे लिनेस क्लब ने सामाजिक जाणीवेतून हे विधायक काम हाती घेतले. याप्रसंगी लिनेस क्लबच्या अध्यक्षा उज्वला शिंदे खजिनदार मनीषा खेडेकर, स्वाती ढवाण, धनश्री गांधी, कीर्ती पहाडे, वैशाली वागजकर, नेहा सराफ, विना यादव, योगिता पाटील, यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी उल्का जाचक, सुवर्णा मोरे, सीमा चव्हाण, अंजली संगई, रिनल शहा, साधना जाचक, विजया कदम, निशा जाचक, स्वाती गांधी, माधवी जोशी आदी उपस्थित होत्या. वनपरिक्षेत्र अधिकारी बाळासाहेब गोलांडे व रोहन देवकाते यांनी विशेष सहकार्य केले.
